वर्धा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज खास देव दर्शनासाठी कुटुंबास सोबत घेतले. मात्र माहूर गडावर जाणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांनी स्काय वॉक अर्थात लिफ्टची सोय देणाऱ्या यंत्रणेचे भूमिपूजन केले. भक्तांना पुढे यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
गडकरी महागाव तालुक्यातील एकवीरा देवीचे दर्शन घेवून बालाजी मंदिर व नंतर यवतमाळला धनंजय दिवाकर पांडे यांच्या घरी भेट देतील. मुख्य म्हणजे हा यवतमाळ दौरा असतानाच खासदार रामदास तडस यांनी नागपूरला परतताना वाटेत देवळी येथे थांबण्याची विनंती गडकरी यांना केली. ती मान्य पण झाली. त्यानुसार गडकरी देवळी येथे आल्यानंतर येथील विभागीय वाहनचालक प्रशिक्षण केंद्रास भेट देतील.
हेही वाचा – चंद्रपूर : वरोऱ्यात युवकाची निर्घृण हत्या; घरापासून ५०० मीटरवर आढळला मृतदेह
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय अंतर्गत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. महामार्गावर वाहन चालविण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणारे हे केंद्र गडकरी यांनीच मंजूर केले असल्याने त्यांचा आशीर्वाद घेणे प्रासंगिक ठरते, असे खासदार तडस म्हणाले.