नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत बस बांधणीसाठी  सुधारीत मानके मंजूर केल्याचे ट्विटव्दारे जाहीर केले. त्यामुळे देशातील बसेसची गुणवत्ता व प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ होईल. देशात बस अपघातांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, भारतातील बस  बांधणीचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने बस बांधणीची सुधारित मानके मंजूर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे पाऊल भारतातील बसेसच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा करण्याचा मार्ग मोकळा करेल, ज्यामध्ये आकस्मिक परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले जाईल, असेही गडकरी यांनी ट्विटमध्ये नमुद केले. याबाबत सूचना मागविण्यासाठी मंत्रालयाकडून या मानकांसाठी मसुदा  प्रकाशित केला जाणार आहे. मला आशा आहे की सर्व स्टेकहोल्डर्स  प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी या उपक्रमाला पाठिंबा देतील, असेही गडकरी यांनी नमुद केले आहे.