लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी सायंकाळी दिल्लीत होणार असून त्यात कोणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. नागपूरमधून सलग दोन वेळा निवडून गेलेले आणि सलग दोनही वेळेत मंत्रिमंडळात स्थान पटकावलले नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा विजयी झाल्यावर पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ठ करणार का याकडे सर्वांचे लक्षलागले होते. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडकरी यांना पंतप्रधान कार्यालयाकडून दूरध्वनी आला असून ते सायंकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहोळ्यात मंत्रिपदाची शपथ घेणार आहे

Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Uddhav Thackeray, candidates, Kalyan, Eknath Shinde, Shiv snea
कल्याण पट्ट्यातील ठाकरेंचे उमेदवार ठरले, शिंदेचे ‘आस्ते कदम’
Eknath Shinde, Balaji Kinikar, Balaji Kinikar apologized, Balaji Kinikar latest news, Balaji Kinikar marathi news,
शिदेंच्या उमेदवाराचे विजयासाठी स्वपक्षियांसमोर लोटांगण, आमदार बालाजी किणीकर यांची शिवसैनिकांसमोर दिलगिरी
Assistant Commissioners, Public Service Commission,
लोकसेवा आयोगाने सात सहाय्यक आयुक्तांची शिफारस यादी केली जाहीर, अवमान याचिका दाखल केल्यानंतर आयोगाची सावध भूमिका
Chartered officers are tempted to join politics Pune news
सनदी अधिकाऱ्यांना राजकारणाची भुरळ!
Chandrakant Patil will file his nomination form from Kothrud Assembly Constituency
२४ तारखेला आमचा मुख्यमंत्री शपथ घेईल; चंद्रकांत पाटील
Sassoon Hospital exceeds capacity facing burden of forensic cases steps are being taken to reduce it
‘ससून’वरील ताण कमी होणार! अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे वानवडी, हडपसर पोलिसांना आदेश

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नागपूरकर गडकरी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. २०१४ मध्ये त्यांनी प्रथम नागपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली व त्यात त्यांनी काँग्रसेचे दिग्गज नेते विलास मुत्तेम वार यांचा तब्बल २ लाख ८६ हजार मतांनी पराभव केला होता. पहिल्यांदाच लोकसभा गाठणाऱ्या गडकरी यांना मोदी यांनी मंत्रिमंडळातही स्थान दिले. रस्ते विकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर विविध प्रकारचे सात खाती त्यांच्याकडे पहिल्या पाच वर्षात होती. यात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी रस्तेविकास खात्यात केली.

आणखी वाचा-बुलढाणा : अठरा जणांची अनामत रक्कम जप्त! तिघांचीच टळली नामुष्की

२०१९ च्या निवडणुकीत ते पुन्हा नागपूरमधून विजयी झालेत. या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य सत्तरहजाराहून अधिक मतांनी कमी झाले. मात्र मोदी-२ च्या मंत्रिमंडळातही गडकरी यांना संधी मिळाली. पाच वर्षात त्यांनी पुन्हा रस्ते विकास व दळणवळण मंत्रालयात अनेककामे केली. २०२४ ची निवडणूक गडकरींना तुलनेने कठीण गेली. पाच लाखांहून अधिक मतांनी आपण विजयी होऊ असा विश्वास गडकरी यांना होता. प्रत्यक्षात ते १ लाख ३७ हजार मतांनीच विजयी होऊ शकले. त्यामुळे त्यांनी विजयाचा जल्लोषही साजरा केला नाही.

आणखी वाचा-अकोला : केंद्रीय मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात? शिवसेना शिंदे गटाकडून…

नागपूरमधून सलग तीन वेळा विजयी होऊन हॅट्रिक साधणारे गडकरी केंद्रात मंत्रीपद पटकावण्याची हॅट्रिक साधणार का याबाबत उत्सुकता होती. गडकरी दोन दिवसांपासून दिल्लीतच मुक्कामी आहेत. एनडीएचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाल्यावर मंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत गडकरी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. रविवारी शपथविधीचा मुहूर्त ठरला. सांयकाळी राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी कोणाला शपथ घ्यायची आहे याची यादी तयार करून त्यांना पंतप्रधान कार्यालाच्या माध्यमातून दूरध्वनी केले जाणार होते. त्यानुसार गडकरी यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत पीएमओमधून दूरध्वनी आल्याचे माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे गडकरी तिसऱ्यांदा मंत्री होणार हे निश्चित झाले आहे.