आयुर्वेदाला आणि भारतीय उपचार पद्धतींना आता जगात मान्यता मिळत आहे. आयुर्वेद डॉक्टरांनी आयुर्वेदिक उपचार करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वैद्य किंवा डॉक्टर पदवी आयुर्वेदाची घेतात आणि उपचार मात्र ॲलोपॅथीचे करतात. त्यामुळे केवळ पदवीचा आधार न घेता समर्पित आणि श्रद्धायुक्त भावनेने आयुर्वेदाचे अनुसरण करून लोकांना दिलासा द्या, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आयुर्वेद डॉक्टरांना दिला.

हेही वाचा- नागपूर : ‘पोलीस भरतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज भरण्याची संधी द्या’; युवक-युवतींचे धरणे आंदोलन

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

आयुर्वेदिक परिषदेचा समारोप रविवारी झाला. यावेळी गडकरी म्हणाले, ज्ञान व अनुभवानंतर पदवी मिळते पण चिकित्सा क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा परिणाम दिसल्यावर सन्मान मिळतो, त्यामुळे अभ्यासादरम्यान मिळालेल्या ज्ञानातून नैतिकता राखत, योग्य औषधांचा वापर करून लोकांना व्याधीमुक्त करणे हा त्याचा परिणाम आहे. ग्रामीण भागात आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार होणे आज आवश्यक आहे. मात्र, आपण पदवी आयुर्वेदाची घेतो आणि उपचार मात्र ॲलोपॅथीचे करतात. असे करणे टाळावे. आयुर्वेदामध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करून संशोधन करण्याची मोठ्या प्रमाणात संधी आहे. आपणच या पॅथीचा उपयोग केला नाही तर लोकांचा विश्वास कसा राहणार? चिकित्सा पद्धतीने नवीन तंत्रज्ञान, साधने आली आहे. आपण औषधांचा दर्जा वाढवत निदानावर उपचार केले तर त्याचे निश्चित परिणाम दिसून येतात. आपण आपल्या पॅथीशी प्रामाणिक असले पाहिजे, असा सल्ला गडकरी यांनी दिला.

हेही वाचा- नागपूर : धक्कादायक! प्रजापती दाम्पत्याद्वारे स्वत:च्याच पाच बाळांची विक्री?

प्रारंभी गडकरी आणि डॉ. जयंत देवपुजारी यांना विठ्ठलाची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आयुर्वेद व्यासपीठाची भूमिका मांडताना विनय वेलणकर यांनी, कुणाचाही विरोध न करता, केवळ सेवा, शिक्षण आणि संशोधनावर आम्ही भर देऊन देशभरात आयुर्वेदाचे स्थान निर्माण केल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. रजनी गोखले यांनी केले. या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित शोध प्रबंध, शिक्षक-प्रशिक्षक, पोस्टर स्पर्धा, प्रॅक्टिशनर आदी गटात प्रत्येक तीन पुरस्कार देऊन सर्व वयोगटातील वैद्यांना सन्मानित करण्यात आले. आभार प्रल्हाद जोशी यांनी मानले.

हेही वाचा- नागपूर : ‘समृध्दी महामार्गाचे उद्घाटन जानेवारीत’; फडणवीस यांचे सूतोवाच

मते द्या, अथवा देऊ नका, कामे करतच राहणार

मला मत दिले तरी ठीक, किंवा नाही दिले तरी ठीक. मी सर्वांसाठी काम करीतच राहणार. कारण खासदार कोणीही असो, त्याने लोकांची कामे केलीच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ताजबाग येथील सौंदर्यीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनाच्यावेळी गडकरी बोलत होते. शहराचा विकास करताना मी काम करणाऱ्यांच्या मागे असतो. जे काम करत नाही, त्यांना चूक दाखवत ठोकण्याचे काम करतो. ताजबादमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे. येथे रुग्णालय बांधायचे आहे. येथे बाहेर गावावरून लोक येतात. त्यांना चांगली आरोग्य सेवा द्यायची आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना ईश्वर देत असतो. फक्त श्रद्धा असायला पाहिजे. राजकारण हा पैसे कमावण्याचा व्यवसाय नाही, असे गडकरी म्हणाले.

Story img Loader