लोकसत्ता टीम
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भन्नाट कल्पना आणि रोखठोक विधानांसाठी प्रसिध्द आहेत. नीरी येथील सभागृहात रविवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सरकारकडे फार पैसे नाहीत. त्यामुळे पीपीई मोडवर विकास कामे करायला हवी. नागपूर महापालिकेमध्ये असाच एक प्रयोग यशस्वी झाला असून यातून पालिकेला वर्षाला ३०० कोटींचे उत्पन्न मिळत असल्याची गडकरी यांनी दिली.
गडकरी म्हणाले सरकारकडे पैशाची कमी आहे. त्यामुळे आपण त्यावर अवलंबून न पीपीई मोडवर कामे करावी असा सल्ला दिला. गरज आधारित, प्रदेशाच्या अनुरूप तसेच तंत्रज्ञान, संशोधन, उद्यमशीलता, भविष्यातील दृष्टिकोन अंगीकारून देशाला, समाजाला समृद्ध करण्यासाठी ग्रामीण आणि कृषी केंद्रित संशोधन वैज्ञानिकांनी केले पाहिजे, असे आवाहन केले.
सिद्ध झालेले तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिक व्यवहार्यता तसेच विपणन क्षमता या चार गोष्टी शिवाय संशोधनाला महत्त्व नाही. नागपूर मध्ये असणारी फ्लाय एश, नाग नदीचे पाणी, कचरा, घनकचरा अशा गोष्टींवर संशोधन होणे आवश्यक आहे अशी सूचना नितीन गडकरी यांनी यावेळी केली.