वर्धा : जाती धर्माचे बंधन झुगारून देत होणाऱ्या विवाहाला कुटुंबाचा क्रोध व समाजाचा रोष सहन करावा लागण्याच्या घटना नेहमीच्याच. मात्र, अशा युगुलास हिंमत देत त्यांचा ‘सत्यशोधकी’ विवाह लावून देण्याचा उपक्रम स्तूत्य ठरत आहे.सेवाग्राम येथील सागर चौधरी व नागपूर जिल्ह्यातल्या जामठा येथील श्वेता ढगे यांचे प्रेम जुळले. श्वेता ही यशवंत महाविद्यालयात विधि शाखेचे शिक्षण घेत आहे तर सागर गाडी चालविण्याचा व्यवसाय करतो. दोघांची ओळख झाली व पुढे त्यात प्रेमांकुर फुटला. एकमेकांशिवाय जगू शकत नाही, अशी मानसिकता झाल्यावर दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

 मात्र, जातीच्या बाहेर लग्न म्हणून दोघांच्याही कुटुंबाने कडाडून विरोध केला. मुलीच्या कुटुंबाचा विरोध दिसून आल्यानंतर सेवाग्रामचे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते नितीन पाटील यांनी पुढाकार घेतला. पाटील यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे गजेंद्र सूरकार यांना भेटून मार्ग काढण्याची विनंती केली. त्यानंतर श्वेता व सागरला वर्धेत बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी दोघेही लग्न करण्याबाबत ठाम दिसून आल्याने त्यांना समाज व कुटुंबाच्या विरोधाची पूर्व कल्पना देण्यात आली. ते गृहीत धरून हे दोघेही लग्नाबाबत आग्रही राहल्याने त्यांचा विवाह लावून देण्याचे ठरले. वर्धा वर्धन केंद्राच्या सभागृहात हा विवाह पार पडला. विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लग्नाचा विधी संघटनेचे निखिल जवादे यांनी पार पाडला. सुनील ढाले, प्रकाश कांबळे व गजेंद्र सुरकार यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली. सर्व विधी महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विवाह पद्धतीनुसार पार पडला.

anil deshmukh latest marathi news
Anil Deshmukh Attack : अनिल देशमुखांवरील हल्ल्यावरून आरोप-प्रत्यारोप!
india 56th tiger reserve
५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प
high court slams mpsc for forgetting Vidarbha
‘एमपीएससी’ला राज्यात विदर्भ असल्याचा विसर’, वैद्यकीय प्राध्यापक पदभरतीबाबत उच्च न्यायालयाचे ताशेरे
police to use aI for investigation in ex home minister anil deshmukh attack case
माजी गृहमंत्र्यांवरील हल्ला: तपासासाठी ‘एआय’चा वापर; विशेष पोलीस महानिरीक्षक भुजबळ म्हणतात, ‘घटना आव्हानात्मक…’
father son killed on the spot in bike taxi collision
खाजगी प्रवासी वाहनाची दुचाकीस धडक; पिता-पुत्र जागीच ठार; कोलवड गावावर शोक कळा
drop in minimum temperature Maharashtra, cold Maharashtra, Maharashtra weather,
किमान तापमानात झपाट्याने घट, थंडीचा कडाका आता वाढणार…
Pratibha Dhanorkar, Praveen Kakade, Warora,
VIDEO : खासदार प्रतिभा धानोरकरांचा धमकीवजा इशारा! ‘व्हायरल व्हिडीओ’ने खळबळ
maharashtra assembly election 2024 Injured anil deshmukh discharge from hospital after treatment
Anil Deshmukh Attacked : दगड मारा किंवा गोळ्या घाला, मी मरणार नाही… रुग्णालयातून बाहेर पडताच अनिल देशमुखांचा….
district administration preparations for elections to seven assembly constituencies in bulldhana
Maharashtra Assembly Election 2024 : हजारो कर्मचारी निघाले मतदान केंद्रांकडे…