नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून भाजपा सरकारने लोकशाहीचा खून केला, अशी टीका माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. मंगळवारी पाचपावली, कमाल चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. राऊत म्हणाले, की सीबीआयच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्रीय तपास संस्थेने बेधडक कारवाई करून देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करावे. मग ते भाजपा नेत्यांवर कार्यवाही का करीत नाही? काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये कुठून आले? एलआयसी, एसबीआय आणि भविष्य निधी निर्वाह कार्यालयात जमा नागरिकांचा पैसा अदानीला का देण्यात आला? देशाचे पंतप्रधान आणि अदानी यांचे नाते काय? हे प्रश्न विचारताच सैरभैर होऊन भाजपा प्रणित केंद्रातील सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. संसदेत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनासुद्धा बोलण्याची संधी देण्यात आली नाही. दलितांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याचे एकही उदाहरण नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ठाकरे गटाच्या कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीवरून वादंग

उत्तर नागपूरचे प्रकल्प पळविले

राज्यात सत्तांतर होताच उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन संस्था वर्धा रोडवर पळविण्याचा घाट घातला जात आहे. भाजपाला उत्तर नागपूरचा इतका तिरस्कार का वाटतो? या भागाचा विकास त्यांना करायचा नाही का, असा प्रश्न यावेळी डॉ. राऊत यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – सावरकर गौरव यात्रेत नितीन गडकरी यांनी चक्क राहुल गांधींचे मानले आभार, म्हणाले, “तुमच्यामुळे..”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव संजय दुबे यांनी केले. मंचावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे जम्मू आनंद, विदर्भ प्रदेश रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष दिनेश अंडरसहारे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी मितेंद्र दर्शन सिंग, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे, रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय महासचिव घनश्याम फुसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते शब्बीर विद्रोही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य, भीम पॅन्थरचे अध्यक्ष मनोज बंसोड, शिवसेनेचे किशोर ठाकरे, सुरेश जग्यासी, उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin raut comment on pm modi in nagpur ask what is the relationship between prime minister and adani rbt 74 ssb
Show comments