नागपूर: अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभेत यंदा तब्बल ६ टक्क्यांनी म्हणजे ६४ हजार ६१८ मतांनी वाढ झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या दलित आणि मुस्लीम समाजाची संख्या मोठी आहे. या मतांचे विभाजन टाळण्यास काँग्रेस यशस्वी झाल्याचे दिसून येते. भाजपला मात्र यात अपयश आले आहे. चौथ्या फेरीनंतर काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत ३३२१ मतांनी आघाडीवर आहेत.
उत्तर नागपूर मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत हे २० हजार मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी ३ लाख ७५ हजार मतदानापैकी १ लाख ९३ हजार म्हणजे ५२ टक्के मतदान झाले होते. यावर्षी मतदारांचीही संख्या वाढली आहे. उत्तर नागपूरमध्ये एकूण मतदार ४ लाख २८ हजार असून यात पुरुष मतदार हे २ लाख १२ हजार तर महिलांची संख्या २ लाख १५ हजार इतकी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. यावेळी उत्तर नागपूरमध्ये एकूण मतदान २ लाख ४८ इतके झाले. यात पुरुष १ लाख २५ हजार तर महिला मतदार १ लाख २३ हजार इतक्या आहेत. मतदानाची टक्केवारी ५८.५ टक्के इतकी आहे. यंदा मतदानाच्या टक्केवारीमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली.
हेही वाचा – नागपूरकरांनो सावधान ! शहराची हवा गुणवत्ता ढासळली
हेही वाचा – मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेला अटकपूर्व जामीन…
उत्तर नागपूर मतदारसंघात पहिल्या फेरीत भाजपचे डॉ मिलिंद माने ५०० मतांनी समोर होते. दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांना ७६९० मते तर भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना ७६४५ मते होती. चौथ्या फेरीनंतर काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत ३३२१ मतांनी आघाडीवर आहेत.