लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : पाणी म्हणजेच जीवन. तेच दूषित असेल तर निरोगी जीवनाचे काय, असा प्रश्न पडणार. शासकीय पातळीवर शुद्ध पेयजल पुरवठा केल्या जाणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत आहे का, याचा तपास आवश्यक ठरतो. भुजल विभागाने नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

या अधिकृत शासकीय अहवालनुसार जिल्ह्यातील ४२ गावात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यात नायट्रेट आढळून आले आहे. जल तपासणीत जिल्ह्यातील ८८० गावात तपासणी झाली. १ हजार १४४ पाणी स्रोत तपासणीस पाठविण्यात आले. त्यापैकी ४२ गावातील ९५ पाणी स्रोत अशुद्ध आढळून आले. म्हणजे त्यात नायत्रेट आढळले.

आणखी वाचा-जिल्हा परिषद ते महापालिका : प्रशासकीय राजवटीचे वर्तुळ पूर्ण

असे नायट्रेटयुक्त पाणी पिल्यास ब्लु बेबी सिंड्रोम या आजाराची लागण होवू शकते. हा एक दुर्मिळ रक्तविकार समजल्या जातो. त्यात हिमोग्लोबिनचा एक घटक मेथेमोग्लोबिन झपाट्याने वाढू लागतो. परिणामी, शरीरातील प्राणवायुचे प्रमाण घटू लागते. प्रामुख्याने सहा महिन्याच्या आतील बाळास त्याचा सर्वाधिक धोका संभवतो. हा धोका लक्षात घेऊन भुजल विभागाने या स्रोतातील पाणी न पिण्याचा इशारा दिला आहे. हा पाणी स्रोत सोडून अन्य पर्याय शोधण्याचा सल्ला पण दिला.

जिल्ह्यातील विविध तालुक्यात असे अशुद्ध पाणी स्रोत आढळून आले आहेत. सेलू तालुक्यात ३५, वर्धा ३५, समुद्रपूर १०, हिंगणघाट ६, कारंजा ५, आष्टी ४. देवळी व आर्वी तालुक्यात आढळून आले नाही. सेलू तालुक्यात ६२ ग्रामपंचायत अंतर्गत पाणी नमुने तपासण्यात आले. त्यात ११ गावातील ३५ पाणी स्रोत दूषित दिसले. तर वर्धा तालुक्यातील ७६ ग्रामपंचायत अंतर्गत नमुने तपासल्यावर ११ गावातील ३५ स्रोत दूषित सापडले. सर्वाधिक नायट्रेट युक्त पाणी स्रोत या दोन तालुक्यात सापडले आहे. भुजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भू वैज्ञानिक मंगेश चौधरी हे म्हणाले की जिल्ह्यात १ हजार ३३० पाणी स्रोत तपासण्यात आले. त्यापैकी ९५ स्रोत दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी सतर्क करण्यात आले आहे.

आणखी वाचा-नागपुरात मानसोपचार तज्ज्ञांकडून महिलांवर अत्याचार प्रकरण…आता थेट उपसभापतींनीच…

मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. कारण असे पाणी आरोग्यासाठी घातक ठरते. वेळीच सावध होणे आवश्यक आहे. प्राप्त माहितीनुसार असे पाणी पिण्यास तसेच दैनंदिन वापरासाठी पण धोक्याचे ठरते. हे पाणी कर्करोगास पण निमंत्रण देणारे ठरू शकते, असे काही डॉक्टरांनी नमूद केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitrate rich groundwater in wardha district pmd 64 mrj