नागपूर : समृद्धी महामार्गावरील अपघात नियंत्रणासाठी परिवहन खात्याने शिर्डीपाठोपाठ बुधवारी नागपुरातही समृद्धी महामार्गाच्या नागपूर द्वारावर वाहनांसाठी मोफत नायट्रोजन हवा व पंक्चर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध केली आहे. छत्रपती संभाजी नगरलाही ही सुविधा देण्याबाबत चाचपणी सुरू आहे.

नागपूर-शिर्डी दरम्यान सातत्याने वाढते अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. बऱ्याच अपघाताला खराब टायर हे एक कारण आहे. टायरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते ९ जूनला शिर्डीत सीएट कंपनीच्या मदतीने मोफत नायट्रोजन हवा भरणे आणि पंक्चर दुरुस्ती, टायर तपासणीसह इतरही सुविधांचा शुभारंभ करण्यात आला.

passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

हेही वाचा – अमरावती : टॅक्‍सीचालकाचा मारेकरी ८० दिवसांनंतर गवसला; प्रेयसीच्या अपहरणासाठी चोरणार होते टॅक्‍सी

शिर्डीनंतर नागपुरातही प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर) राजाभाऊ गीते यांच्या हस्ते बुधवारी समृद्धीच्या प्रवेशद्वारावर या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. छत्रपती संभाजी नगरमध्येही लवकरच या सेवेबाबत चाचपणी होणार आहे.

दिवसाला १५ हजार वाहनांचा प्रवास

नागपूर-शिर्डी दरम्यान एकूण २० प्रवेश व गंतव्य ठिकाणे आहेत. नुकतेच सुरू झालेल्या शिर्डी-घोटीपर्यंत आणखी दोन द्वार आहेत. या महामार्गावर दिवसाला सुमारे १५ हजार वाहने धावतात. त्यापैकी सुमारे ७० टक्के वाहनांचा प्रवेश आणि गंतव्यावर पोहोचण्याचा प्रवास नागपूर, शिर्डी, औरंगाबाद या तीन शहरांतील द्वारातून होतो. त्यामुळे या ठिकाणी टायरमध्ये नायट्रोजन हवा भरली जाणार आहे. नायट्रोजन हवेमुळे टायर जास्त गरम होत नाही, हे विशेष.

हेही वाचा – नवी अमरावतीहून पंढरपूरसाठी विशेष रेल्‍वेगाडी; पण फेऱ्या कमी

परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या संकल्पनेतून शिर्डीपाठोपाठ नागपुरातही मोफत नायट्रोजन हवा, पंक्चर दुरुस्तीसह इतर सुविधांचा प्रारंभ झाला. यामुळे अपघात कमी होतील, असा विश्वास आहे. – राजाभाऊ गीते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर).