नायलॉन मांजाच्या वापरण्यासह त्यांची विक्री, साठवणूक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र शहरात आजही नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे उपद्रवी शोध पथकाची कारवाई केवळ कागदावरच होत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>>नागपूर नव्हे काश्मीर! थंडीच्या लाटेने शहर गारठले; आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
शनिवारी एका लहान मुलीचा मांजाने गळा कापल्यानंतर प्रशासन थोडेसे हलले. पण, व्यापक कारवाईची गरज आहे. शहरात मोठ्या प्रमाणात नॉयलॉन मांजाची विक्री सुरू आहे. कारवाईसाठी पथक आले की नायलॉन मांजा लपवून ठेवतात आणि पथक गेल्यानंतर तो पुन्हा बाहेर काढतात. जुनी शुक्रवारी आणि इतवारी, जागनाथ बुधवारी आणि हसनबाग परिसरात पतंग आणी मांजाची दुकाने थाटली आहेत.
हेही वाचा >>>रस्ता सुरक्षा समित्यांचा गुंता अखेर सुटला! सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पदनामाबाबत स्पष्टता
महापालिका प्रशासनाने आठ दिवस आधी नॉयलॉन मांजावरील कारवाई कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर आता कुठे जिल्हा प्रशासनाने आदेश काढले. नॉयलॉन मांजा येतो कुठून याचा शोध घेण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. मात्र याबाबत प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे बाजारात अनेक ठिकाणी पडद्याआडून नॉयलॉन मांजाची विक्री सुरूच आहे.