नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त गट-ब व गट-क-२०२४ च्या जाहिरातीची स्पर्धा परीक्षार्थी चातकाप्रमाणे वाट बघत असताना वर्ष उलटूनही अद्याप पदभरतीची चिन्हे दिसत नसल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. मराठा आरक्षणामुळे जाहिरातीत बदल करायचा असून शासनाकडून सुधारित मागणीपत्र ‘एमपीएससी’ला अद्यापही प्राप्त न झाल्याने संयुक्त परीक्षेची जाहिरात रखडल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने पदे असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचेही मागणीपत्र अद्याप प्राप्त झालेले नाही.

आचारसंहिता फटका बसण्याची शक्यता

‘एमपीएससी’च्या वतीने राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा दरवर्षी घेतली जाते. संयुक्त परीक्षेसाठी मागील वर्षी सात हजारांवर जागांसाठी जाहिरात आली होती. एप्रिल २०२३ मध्ये परीक्षाही घेण्यात आली. यावर्षीही जवळपास आठ हजार जागांसाठी जाहिरात येईल या अपेक्षेने राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थी पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये परीक्षेची तयारी करीत आहेत. यासाठीचा मोठा आर्थिक भार त्यांना सहन करावा लागत आहे. राज्यात मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर अनेक जाहिराती आणि मागणीपत्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठीच्या (एसईबीसी) नव्या आरक्षणानुसार पदसंख्या आणि आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्रे प्राप्त झाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असे आयोगाने सांगितले होते. मात्र, सप्टेंबर उजाडूनही अनेक सरकारच्या शासकीय विभागांकडून मागणीपत्र न आल्याने जाहिरात देता येणार नाही असे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृह विभागाने लवकर पोलीस उपनिरीक्षक पदाचे मागणीपत्र पाठवावे अशी मागणी केली जात आहे.

Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

हेही वाचा : ‘तुमचे नुकसान भरून काढू, पण एक दिवस सुट्टी घेऊ द्या’, शिक्षक करताहेत विनंती

संयुक्त परीक्षेवर ‘एमपीएससी’चे म्हणणे काय?

‘एमपीएससी’ने संयुक्त परीक्षेसंदर्भात नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. यानुसार, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता (एसईबीसी) आरक्षणासंदर्भातील अधिनियम २६ फेब्रुवारी २०२४ मधील तरतुदी विचारात घेता शासनाच्या संबंधित सर्व विभागांकडून गट-ब व गट-क सेवेतील पदांकरिता सुधारित मागणीपत्र प्राप्त करूनन घेतले जात आहे. परंतु, शासनास विविध पदांकरिता सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबतच्या विनंतीनुसार काही सेवेतील पदांचे सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त झालेले आहेत तर काही पदांचे (पोलीस उपनिरीक्षक, अन्य विभागातील लिपिक-टंकलेखक) मागणीपत्रे अद्याप अप्राप्त आहेत. त्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू असून सुधारित मागणीपत्रे प्राप्त होताच महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.