लोकसत्ता टीम

बुलढाणा: शिवसेनेतील महाबंडाची वर्षपूर्ती साजरी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडाळी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून आमदार राजेंद्र शिंगणेंच्या भूमीकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ‘आमची साहेबांशी चर्चाच झाली नाही’ अशी प्रतिक्रिया प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिल्याने गूढ वाढले आहे.

शिवसेना मधील बंडाला जेमतेम वर्ष होत नाही तोच आज रविवारी घड्याळाचे काटे उलटे फिरले. राष्ट्रवादीचे नाराज नेते अजित पवार चाळीस आमदारासह सरकार मध्ये सहभागी झाल्याचे वृत्त येऊन धडकले. यामुळे जिल्हा राष्ट्रवादी मध्येही राजकीय भूकंप आला. माजी मंत्री तथा सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्यावर जिल्ह्याचा डोलारा आहे. यापरिनामी त्यांची भूमिका महत्वाची आहे. तूर्तास त्यांचे नाव’ यादीत’ नाव नसल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-“हे तर अपेक्षितच होते…”, नवनीत राणा यांची सूचक प्रतिक्रिया

‘साहेब’ शिंदे सरकार मध्ये जाणार नाही याची पदाधिकाऱ्यांना खात्री आहे. मात्र त्यांच्या समवेत चर्चा न झाल्याने स्थानिक नेते अस्वस्थ आहे. जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी’ आम्ही आहोत तिथेच आहो’ अशी सूचक प्रतिक्रिया दिली. अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. आमदार शिंगणे यांच्याशी संपर्क व चर्चा होऊ शकली नाही.

पहाटेच्या शपथेला होते, पण…

दरम्यान मागील काळात गाजलेल्या व अजूनही अधूनमधून गाजणाऱ्या ‘ पहाटेच्या अजितदादांच्या शपथविधीला आमदार शिंगणे हजर होते. मात्र, दुपारी शरद पवारांकडे परतलेल्या शिंगणे यांनी सर्व घडामोडी माध्यमासमोर विशद केल्या होत्या. मात्र सध्या ते बंडापासून अलिप्त असल्याचे चित्र आहे…

Story img Loader