नागपूर : ‘मोखा’ या चक्रीवादळाची चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असली तरी विदर्भाला मात्र त्याचा धोका नाही. सूर्यनारायण मात्र विदर्भावर कोपला असून तापमानाने सरासरी ओलांडली.

गेल्या आठवड्यापासून उन्हाळ्याची खरी सुरुवात झाली आहे. अकोला शहरात सलग तीन दिवसांपासून पारा ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. तर नागपूरसह काही शहरात तो ४५ व काही शहरात ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. रविवारी अकोला शहरात ४५.५ अंश सेल्सिअस इतके राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. तर देशात ते तेराव्या क्रमांकावर होते.

हेही वाचा – कोकणात उष्णतेच्या लाटांचा इशारा, राज्यात तीन आठवडय़ांपासून सरासरीपेक्षा अधिक तापमान

हवामान खात्याने रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. त्यानुसार अकोला, अमरावती या शहराने तापमानाची पंचेचाळीशी तर वर्धा, नागपूर या शहरांनी तापमानाची चौरेचाळीशी ओलांडली. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तर रात्रीदेखील असह्य उकाडा कायम आहे. एरवी सायंकाळी थंड होणारे नागपूर शहर रात्रीदेखील तेवढेच गरम आहे. मात्र, दुपारी मंदावलेली रस्त्यांवरील वर्दळ सायंकाळी कायम आहे.

Story img Loader