अमरावती : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ जागांपैकी सात जागांवर महायुतीचा विजय झालेला… भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह गगनावरी गेलेला… यावेळी हमखास मंत्रिपद मिळेल, अशी कार्यकर्त्यांची दृढ झालेली धारणा…पण, सर्वांचा अपेक्षाभंग झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नाही. पण, या जखमेवर फुंकर घालणारी एक वार्ता समोर आली. अमरावती जिल्ह्याचे जावई खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना मंत्रिपद मिळाल्याचा आनंद व्यक्त होऊ लागला आहे.
हेही वाचा – परभणीतील घटनेचे बुलढाणा जिल्ह्यात पडसाद, मलकापूर पांग्रा कडकडीत बंद
आकाश फुंडकर यांचे सासरे भारत गोळे हे दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे राहतात. पाच-सहा वर्षांपूर्वी भारत गोळे यांची कन्या स्नेहा आणि आकाश फुंडकर यांचा विवाह अकोला येथे पार पडला, अशी आठवण भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि श्रमराज्य परिषदेचे अरविंद नळकांडे सांगतात.
भारत गोळे यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. स्नेहा फुंडकर यांनी अमरावतीच्या पी.आर. पोटे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतले आहे. आकाश फुंडकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचा आनंद पिंपळोदवासीयांना झाला आहे. अमरावती जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नाही, किमान जावईबापूंना संधी मिळाली, याचे समाधान व्यक्त होऊ लागले आहे.
भाऊसाहेब फुंडकर यांच्यानंतर खामगावचे प्रतिनिधित्व करणारे आकाश फुंडकर यांना मंत्रिपद मिळाले आहे. यापूर्वी भाऊसाहेब फुंडकर यांनी कृषिमंत्री म्हणून काम केले आहे. विधान परिषदेचे सदस्य असताना २०१८ मध्ये भाऊसाहेब फुंडकर यांचे निधन झाले. आकाश फुंडकर यांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे नेला आहे. आकाश फुंडकर यांनी २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत सलग तीन विजय मिळवीत भाजपचे वर्चस्व कायम ठेवले. आकाश फुंडकर यांना मंत्रिपद मिळाल्याने खामगावमधील भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, त्याचवेळी त्यांचे सासर असलेल्या पिंपळोदमध्ये देखील आनंद व्यक्त होत आहे.
हेही वाचा – “वाल्मिक कराडला अटक करा, अन्यथा आंदोलन”, आमदार क्षीरसागर यांचा इशारा
आकाश फुंडकर यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांबरोबरच आपल्याला आणि मित्रमंडळीलाही अत्यानंद झाल्याचे भाजपचे नेते अरविंद नळकांडे म्हणाले. या माध्यमातून त्यांना शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविता येतील. अमरावती जिल्ह्याकडे त्यांचे विशेष लक्ष राहील, अशा शब्दात नळकांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षाच्या नेतृत्वाने ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत, त्या आकाश फुंडकर नक्कीच सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण करतील, असाही विश्वास अरविंद नळकांडे यांनी व्यक्त केला.