लोकसत्ता टीम

चंद्रपूर : देशाला आत्मनिर्भर आणि जगातील तिसरी महाशक्ती बनवायचे असेल, राज्याचा, चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महायुतीशिवाय दुसरा पर्यायच नाही. मतपेढीचे आणि जातीजातीमध्ये विष कालवण्याचे हीन राजकारण करणाऱ्यांना दूर लोटा आणि महायुतीला कौल द्या.

nitin gadkari on constitution
संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
official language in india article 343 for official language of the union
संविधानभान : राष्ट्रभाषा नव्हे; राजभाषा
Rahul Gandhi Devendra Fadnavis Red Book
Red Book : ‘संविधान बदलणार’ या मविआच्या नरेटिव्हला भाजपाचं प्रत्युत्तर; विधानसभेला ‘लाल पुस्तका’ची चर्चा का होतेय?
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
Congress response to Fadnavis criticism of the Prime Minister print politics news
‘पंतप्रधानांना बदलायचे आहे हे तेच संविधान’; फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर
Ajit Pawar group Dilip Walse Patil Politics
Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान देशात आज आणि उद्या कुणीच बदलवू शकणार नाही, बदलविण्याचा प्रयत्न देखील करणार नाही. काँग्रेस संविधनाबद्दल अपप्रचार करीत आहे. त्यामुळे महायुतीला विजयी करा असे आवाहन केंद्रीय वाहतूक आणि रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले. बल्लारपूर मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर व घुघुसस येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

आणखी वाचा-“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मंचावर ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल, जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, डॉ. अशोक जीवतोडे, विजय राऊत, राहुल पावडे उपस्थित होते. या निवडणुकीत मुनगंटीवार व जोरगेवार यांना निवडून आणाल तर यापुढे ही चंद्रपूर जिल्हा विकासाची ट्रेन तिप्पट वेगाने धावेल असा विश्वास ही गडकरी यांनी व्यक्त केला. लोक कल्याणाच्या सरकारी योजनांचे लाभ जातीधर्मा पलिकडे जाऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार झटत आहे.

मात्र, विरोधकांना केवळ जातीपातीचे राजकारण करायचे आहे अशी टीका गडकरी यांनी केली. आज सर्वत्र पायाभूत सुविधा बळकटीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. शेतक-याला संपन्न करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. बांबू पासून मिथेनॉल, बायो एव्हिएशन इंधन निर्मिती चंद्रपूर येथे होत असून, शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता आणि इंधनदाता बनला आहे. बल्लारपूर येथे मिथेनॉल सोबतच, अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प होणार असल्याचेही ते म्हणाले. पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यामुळे आज ताडोबा व्याघ्र प्रकल्प जागतिक स्तरावर पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरला आहे. मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार सरकारच्या प्रयत्नामुळे ताडोबा जंगलात आज वायु आणि ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक गाड्या लवकरच धावणार आहेत असेही त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा-Video : निवडणूक चिन्ह चप्पल, उमेदवार करतो पदस्पर्श, यवतमाळमध्ये अनोखा प्रचार

तंत्रज्ञानाच्या बळावर आणि मोदी सरकार आणि महायुती सरकारमुळे २०१४ पूर्वी एक ही कि.मी. चा राष्ट्रीय महामार्ग नसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आज डबल इंजिन सरकारमुळे तब्बल १० हजार रुपयांचे ४७४ कि.मी. राष्ट्रीय महामार्ग तयार झाले आहे. नुकतेच नागपूर विमानतळाचे भूमीपूजन झाले. या विमानतळावरून शेतक-यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर पहिले विमान झेप घेईल हा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. ५ हजार कोटींची महामार्ग बांधणीची कामे मंजूर झाली आहेत. चंद्रपूर मध्ये पाण्यावर उतरणारी विमानसेवा ही लवकरच सुरू होईल असेही ते म्हणाले. यावेळी गडकरी म्हणाले की चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासात मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा आहे.

राज्याचे वनमंत्री या नात्याने पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन क्षेत्रात काम करत जिल्ह्याचा कायापालट केला आहे. वृक्ष लागवडीमध्ये त्यांनी जागतिक विक्रम केला आहे. विकासाची आस असलेली बल्लारपूरची जनता तळमळीने काम करणाऱ्या मुनगंटीवार यांना जनता प्रचंड बहुमताने विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर जोरगेवार चंद्रपूर विधानसभेचा विकास करतील. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या पाठीशी राहावे. चंद्रपुरात बायपास मार्ग व पडोली ते बंगाली कॅम्प हा उड्डाणपुल निवडणुकीनंतर तत्काळ मंजूर करणार असल्याची घोषणा केली.