नागपूर : राज्य व्यापण्यासाठी मान्सूनने प्रतिक्षा करायला लावली असली तरीही तापमानात मात्र सातत्याने चढउतार होत आहे. राज्यातील बहुतांश भागात उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस प्रामुख्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. खात्याने उष्णतेचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

जून महिन्याचा पूर्वार्ध संपला तरीही अजूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय झालेला नाही. त्यामुळे तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी अधिक आहे. विदर्भातील गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका
weather department, Cold weather
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा – नागपूर : डॉक्टरकडून स्वतःच्या नर्सिंग होममध्ये जन्मलेल्या बाळाची विक्री

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होऊन वातावरणात गारवा निर्माण होतो आणि तापमान कमी होत असते. मात्र, यंदा दमदार पाऊस न झाल्याने तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवस विदर्भात उष्णता जास्त जाणवणार आहे. या परिस्थितीत नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

हेही वाचा – वर्धा : माकडांचा उच्छाद! गावकऱ्यांची बंदोबस्त समिती अन शंभरावर माकडे…

‘बिपरजॅाय’ चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. मान्सून लांबल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहे. २३ जूननंतर मान्सून संपूर्ण राज्यात सक्रीय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानेदेखील जोपर्यंत ५० ते ६० टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे.