लोकसत्ता टीम
नागपूर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कामासाठी महापालिकेच्या लकडगंज झोनमधील ७०० मीमीची जलवाहिनी स्थानांतरित करण्यात येत आहे. त्यासाठी पूर्व नागपुरातील काही वस्त्यांमध्ये ८ व ९ नोव्हेंबरला पाणी पुरवठा केला जाणार नाही.
आणखी वाचा-“हिम्मत असेल तर भाजपने…” माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन
लगडगंज झोनने ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० पर्यंत पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रजापती नगर, नेहरू नगर झोपडपट्टी, कामाक्षी नगर, संघर्ष नगर, माँउमिया कॉलनी, वाठोडा जुनी वस्ती, सदाशिव सोसायटी, पँथरनगर (भाग), देवी नगर, न्यूसूरज नगर, देशपांडे ले-आऊट या वस्त्यांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.