लोकसत्ता टीम
चंद्रपूर: जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. यासाठी राजकीय पक्ष, सहकार नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, २१६ जागांसाठी तब्बल ७६३ जणांनी नामांकन भरले असून, उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून सहकार क्षेत्रातील काही दिग्गज उमेदवारांना सभापती, संचालक पदाच्या उमेदवारीचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या बघता राजकीय नेत्यांना चांगलीच धडकी भरली आहे.
जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी प्रत्येकी १८ सदस्य निवडून द्यायचे आहेत. २० एप्रिलला नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, २१ एप्रिलला निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. विशेष म्हणजे, ५ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया २० एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र, मागील काही दिवसांत अर्ज माघारी घेणाऱ्यांचा आकडा तुलनेने अत्यंत कमी आहे.
त्यामुळे या क्षेत्रातील दिग्गज मतदानाचे गणित जुळविण्यात सध्या व्यस्त झाले आहेत. कोणामुळे फायदा, कोणामुळे नुकसान याचे गणित जुळवत असून, कार्यकर्त्यांच्या भोजनावळीही सुरू झाल्या आहेत. काहीही झाले, तरी निवडणूक लढवायचीच, या मनस्थितीत नामांकन अर्ज दाखल केले आहे. १२ बाजार समितीसाठी २१६ उमेदवार निवडून द्यायचे आहे. यासाठी ७६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक लढणाऱ्या या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याकरिता २० एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे २० एप्रिलनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा… अमरावती : दिराने केला वहिनीसोबत बळजबरीचा प्रयत्न
सभापतीला विशेष महत्व
खरीप तथा रब्बी हंगामात पिकणारा शेतमाल शेतकऱ्यांकडून बाजार समित्यांमध्ये विक्रीस आणला जातो. यापोटी बाजार समितींना सेसच्या माध्यमातून वर्षाकाठी कोट्यवधींचा महसूल प्राप्त होतो. हा सर्व कारभार सभापती अन संचालकांच्या नियंत्रणात असतो. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये बाजार समिती सभापती आणि संचालकांच्या पदाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.