जिल्ह्यासह राज्यातील २३५९ ग्राम पंचायतींच्या निवडणुकासाठी सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता नामांकनाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. यामुळे हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या ५ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ४८ सार्वत्रिक तर ५९ पोटनिवडणुकांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> सहा लाखांचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी मेस्सो पोलिसांच्या जाळ्यात

यासाठी १६ ऑक्टोबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून २० अंतिम मुदत आहे. यासाठीचे अर्ज व घोषणपत्र (अफिडीव्हेट) ‘ऑनलाइन’ पद्धतीने भरणे आवश्यक आहे. मात्र घोषनापत्रची प्रत (प्रिंट) काढताना तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या. या तक्रारी ‘महा ऑनलाइन’कडून दूर करण्यात आल्या आहे. मात्र, उमेदवारांची अडचण व सुविधा लक्षात घेऊन आयोगाने १८ ते २० दरम्यान अर्ज सादर करण्याची वेळ संध्याकाळी ५.३० केली आहे. निर्धारित कार्यक्रमात ही वेळ दुपारी ३.३० वाजताची होती.

Story img Loader