नागपूर : ओरिसा, पंजाब, राजस्थान, मणिपूरसह इतर काही राज्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तेथील शासनाने स्थायी केले. महाराष्ट्रातही या सगळ्यांना स्थायी करा, म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात निदर्शने केली. हे कर्मचारी एक दिवस आंदोलनात असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध असो, स्थायी होणे हा आमचा हक्क अशा घोषणा देत शासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात आरोग्य विभागाच्या आखत्यारित राष्ट्रीय आरोग्य अभियानात गेल्या पंधरा वर्षांपासून डॉक्टरांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंतचे कर्मचारी सेवा देत आहेत. सध्या राज्यात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच रुग्णांना दिलासा दिला जात आहे. त्यामुळे इतर काही राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही या कर्मचाऱ्यांना स्थायी करून न्याय देण्याची मागणीही यावेळी केली गेली. सोबत आंदोलनस्थळी १७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान सेवेवर असताना असहकार आंदोलन केले जाईल. या आंदोलनात काम करताना शासनाला रुग्णांसह इतर नोंदीची माहिती कळवली जाणार नाही. तर २५ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्याचीही घोषणा केली गेली.

हेही वाचा – ४० वर्षीय महिलेने २४ वर्षाच्या तरुणाला ओढले प्रेमाच्या जाळ्यात अन् पतीचा…

हेही वाचा – नागपूर : ‘एम्स’चे शवविच्छेदनगृह प्रलंबितच! २० किलोमीटर लांब न्यावे लागतात मृतदेह

आंदोलनात नागपूर जिल्ह्यातील १,२५० कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह राज्यातील ४२ हजार कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी-कर्मचारी समायोजन कृती समितीचे दिलीप उटाणे यांनी केला. आंदोलनस्थळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार अभिजित वंजारी यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनीही आपल्या मागण्या शासनाकडे लावून धरण्याचे आश्वासन दिले. तर आंदोलनात प्रवीण बोरकर, पवन वासनिक, प्रफुल्ल पोहणे, रेखा टकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Non cooperation movement of contract officers employees of health department in nagpur from today mnb 82 ssb
Show comments