गोंदिया :-  गुरूवार ११ जुलै ते बुधवार १७ जुलै या एक आठवडा दरम्यान नॉन इंटरलॉकिंग काम, ऑटो सिग्नलिंग सिस्टीम आणि मल्टीपल लाईन इलेक्ट्रिफिकेशनमुळे ट्रेनचा मार्ग विस्कळीत झाला आहे. यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील बिलासपूर-चांपा मल्टिपल लाईनवर अकलतारा ते जंजगिरनैला अशी ऑटो सिग्नलिंग सिस्टीम आणि  साईडिंग लाईनची जोडणी करण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंगचे काम संयुक्तपणे केले जात आहे. नागपूर विभाग अंतर्गत ११ ते १७ जुलैपर्यंत या विभागातून जाणाऱ्या अनेक गाड्यांचे कामकाज प्रभावित होणार आहे.

दक्षिण – पूर्व – मध्य रेल्वे ने दिलेल्या माहितीनुसार रद्द केलेल्या गाड्या

 ११,१२,१४,१५ आणि १६ जुलै २०२४ रोजी गोंदियाहून सुटणारी गाडी क्र. १२०७० गोंदिया-रायगड रद्द राहील.

 १२,1१३,१५,१६ आणि १७ जुलै २०२४ रोजी रायगडहून सुटणारी ट्रेन क्र. १२०६९ रायगड- गोंदिया रद्द राहील. ११,१२,१३,१४ आणि १५ जुलै २०२४ रोजी गोंदियाहून सुटणारी गाडी क्र. ०८८६१ गोंदिया-झारसुगुडा रद्दच राहील.

 झारसुगुडा येथून १२,१३,१४,१५ आणि १६ जुलै २०२४ रोजी निघणारी ट्रेन क्र. ०८८६२ झारसुगुडा- गोंदिया रद्द राहील.

याशिवाय, खालील गाड्या बिलासपूर येथे संपतील आणि बिलासपूर येथूनच सुटतील.त्या या प्रकारे आहेत.

 टाटानगर येथून ११,१२,१३,१४आणि १५ जुलै २०२४ रोजी सुटणारी ट्रेन क्र. १८१०९ टाटानगर -नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी.

व नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी येथून १२,१३,१४,१५,१६ आणि १७ जुलै २०२४ पर्यंत सुटणारी ट्रेन क्र. १८११० नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-टाटानगर एक्सप्रेस.

हेही वाचा >>>अकोला : नसबंदीला पुरुषांची नकारघंटा का?, महिलांनाच… 

तसेच १२,१३,१४,१५ आणि १६ जुलै २०२४ रोजी कोरबा येथून सुटणारी ट्रेन क्र. १८२३७ कोरबा-अमृतसर एक्सप्रेस.

. यशवंतपूर येथून १२-०७-२०२४ रोजी निघणारी गाडी क्र. १२२५१ यशवंतपूर-कोरबा एक्सप्रेस.

 १४-०७-२०२४ रोजी कोरबा येथून सुटणारी गाडी क्र. १२२५२ कोरबा यशवंतपूर एक्सप्रेस.

१२-०७-२०२४ रोजी कोचुवेली येथून निघणारी ट्रेन क्र. २२६४८ कोचुवेल्ली-कोरबा एक्सप्रेस.

१३-०७-२०२४ रोजी कोरबा येथून सुटणारी गाडी क्र. २२६४७ कोरबा-कोचुवेली एक्सप्रेस.

आणि

१२, १३ आणि १५ जुलै २०२४ रोजी निजामुद्दीन येथून सुटणारी ट्रेन क्र. १२४१० निजामुद्दीन- रायगड एक्सप्रेस.

 १२, १३, १५ आणि १७ जुलै २०२४ रोजी रायगडहून सुटणारी ट्रेन क्र. १२४०९ रायगड-निजामुद्दीन एक्सप्रेस.

भारतीय रेल्वेबाबत थोडक्यात

ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज २३१ लाख प्रवासी आणि ३३ लाख टन मालाची वाहतूक करते. भारतीय रेल्वेच्या मालकीत भारतीय रेल्वेमध्ये १२,१४७ इंजिने, ७४,००३ प्रवासी डबे आणि २८९,१८५ वाघिणी आहेत आणि रोज ८,७०२ प्रवासी गाड्यांसहित एकूण १३,५२३ गाड्या धावतात. भारतीय रेल्वेची ३०० रेल्वे यार्डे, २,३०० मालधक्के आणि ७०० दुरुस्ती केंद्रे आहेत. ही रेल्वे जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा आहे. १२.२७ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे. रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातील विभाग, भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्याचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. ही जगातील सर्वांत मोठ्या संस्थांपैकी एक आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Non interlocking work auto signaling system and multiple line electrification to disrupt train routes gondiya sar 75 amy
Show comments