लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमची तिसरी आघाडी नसणार तर शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांची आघाडी असणार आहे, त्याबाबत चर्चा सुरू आहे. आम्ही महाविकास आघाडी सोबत राहायचे की महायुतीसोबत याबाबतची भूमिका आम्ही ९ ऑगस्ट नंतर स्पष्ट करणार असल्याचे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

आमदार बच्चु कडू नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. प्रहारचे नऊ ऑगस्टला संभाजीनगरला महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आम्ही विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार आहे. कार्यकर्त्याची मते जाणून घेणार आहे. तिसरी आघाडी म्हणून आम्ही नवीन पक्ष सुरू करणार नाही तर शेतकरी शेतमजूर आणि कष्टकरी यांना सोबत घेऊन आम्ही आघाडी करणार आहे. संभाजीनगरच्या महामोर्चानंतर आमची राजकीय भूमिका स्पष्ट होईल मात्र तो पर्यंत वाट पहा असेही बच्चु कडू म्हणाले.

आणखी वाचा-भाषेमुळे घोळ अन् संसाराचा बट्ट्याबोळ! ‘भरोसा’मुळे सुटली नात्यातील गुंतागुंत…

रविकांत तुपकर आता शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम करणार आहे आम्ही सुद्धा दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो आहे. राजू शेट्टी यांच्यासोबत या संदर्भात काही संवाद झाला नाही मात्र राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्याशी समन्वय साधून याबाबत चर्चा करण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या नेत्यांनी सर्वांनी एकत्र असा आमचा विचार आहे. राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांच्यावर कारवाई केली हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि त्यावर आम्ही बोलणार नाही मात्र शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या सर्व नेत्यांनी आणि पक्षांनी एकत्र यावे अशी आमची भूमिका आहे त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे मात्र आम्ही ९ ऑगस्टनंतर त्याबाबतची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बच्चु कडू म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवणे गैर नाही. प्रत्येकाची राजकीय महत्त्वकांक्षा आणि काही उद्देश असतात. त्यांनी जर राज्यात विधानसभा निवडणुकीबाबत जर घोषणा केली असेल तर त्यात नवल काही नाही. त्यांना सोबत घ्यायचे की नाही याबाबत त्यांच्यासोबत याबाबत कुठलाही संवाद नसल्याचे कडू म्हणाले.

आणखी वाचा-“हा न्यायालयाचा अवमानच!” व्हीएनआयटी व प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे नागरिक संतप्त

जरांगे पाटील यांनी मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेलमध्ये टाकतील अस आरोप केला आहे त्या आरोपात तथ्य असेल मात्र मला मारण्याचा त्यांचा कट आहे हा त्यांचा आरोप आरोप संयुक्तिक आणि यग्य नाही. असे आरोप करणे चुकीचे असल्याचे कडू म्हणाले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आरोप यांनी देवेंद्र पडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत मला माहिती नाही. श्याम मानव यांनी कोणाची सुपारी घेतली किंवा त्यांनी कोणासाठी प्रचार करावा आहे त्यांचा विषय आहे असेही कडू म्हणाले.

राज्य सरकारकडे निधी नाही. आमदारांना विकासासाठी पैसा उपलब्ध नसेल तर अजित पवार तरी कसे देतील. अल्पसंख्याकांना अजुनही एक खडकू दिला नाही. मुस्लिम समाजासाठी वापरणाऱ्या निधीला अर्थसंकल्पात एक रुपयाची तरतूद करण्यात आली नसल्याचे बच्चु कडू म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not a third alliance for assembly elections but an alliance of farmers and agricultural laborers says bachchu kadu vmb 67 mrj
Show comments