लोकसत्ता टीम

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उमेदवार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष नागपूरकडे लागले होते. काँग्रेसने गडकरी यांना टक्कर देण्यासाठी विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली.

Madhukar Kukde returns to BJP after 10 years
तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!

या दोन मुख्य पक्षांसह नागपूर लोकसभा मतदार संघातून एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. यासह मतदारांना नोट चा पर्याय देखील उपलब्ध करून दिला गेला होता. मंगळवारी झालेल्या मतगणनेत नितीन गडकरी यांनी अपेक्षेप्रमाणे आघाडी घेतली. विकास ठाकरे यांनीही त्यांना जोरदार टक्कर देत एकतरफा लढत होऊ दिली नाही. मात्र नागपुरातील इतर उमेदवारांना एक हजार मते मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागला. याउलट नोटाने मतदारसंघातील इतर २३ उमेदवारांपेक्षा अधिक प्राप्त केली. याला अपवाद केवळ बहुजन समाज पक्षाचे उमेदवार ठरले.

आणखी वाचा-2024 Maharashtra Lok Sabha Election Result Live Updates भंडारा, अमरावती, व अकोल्यात भाजप, काँग्रेस मध्ये विजयासाठी रस्सीखेच

मंगळ‌वार दुपारपर्यंत बसपचे उमेदवार योगेश लांजेवार हे मतगणनेत तिसऱ्या स्थानावर असून त्यांना १३ हजार १५० मते प्राप्त झाली. यानंतर मतदारांनी सर्वाधिक पसंती नोटाला दिली. नोटाला दुपारपर्यंत ३ हजार ७१९ मते मिळाली आहेत. देश जनहित पक्षाचे उमेदवार किविंसुका सुर्यवंशी ( १ हजार ४४९ मते) आणि अपक्ष उमेदवार आदर्श ठाकूर ( १ हजार ९६ मते) वगळता इतर उमेदवार एक हजार मतांचा आकडा देखील गाठू शकले नाही. नागपूर लोकसभा मतदार संघात गडकरी आणि ठाकरे वगळता इतर सर्व उमेदवारांची सुरक्षा ठेव जप्त होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय आहे की लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला २५ हजार रुपये सुरक्षा ठेव जमा करावी लागते. मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी सहावा भाग उमेदवाराला प्राप्त न झाल्यास उमेदवारांची सुरक्षा ठेव जमा केली जाते.

यांना एक हजाराहून कमी मते

ॲड.उल्हास दुपारे (९१२ मते), फहीम खान (६०५ मते), सुरज मिश्रा ( ५६३ मते), टेकराज बेलखोडे (५१६ मते), गरुद्री आनंदकुमार (४७३ मते), धनू वलथरे (४२१ मते), विजय मानकर (४१९ मते),विशेष फुटाणे (४०४ मते), संतोष लांजेवार (३९३ मते),श्रीधर साळवे (३२३ मते), गुणवंत सोमकुंवर (३०५ मते), सुनील वानखेडे (२३० मते), दीपक मस्के (१७९ मते),सुशील पाटील (१७१ मते), संतोष चव्हाण (१६१ मते),नारायण चौधरी (१५८ मते), प्रफुल भांगे (१४८ मते),सचिन वाघाडे (१३९ मते),बबिता अवस्थी (१२६ मते),विनायक अवचट (१२६ मते),साहिल तुरकर (९५ मते)