लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उमेदवार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष नागपूरकडे लागले होते. काँग्रेसने गडकरी यांना टक्कर देण्यासाठी विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली.
या दोन मुख्य पक्षांसह नागपूर लोकसभा मतदार संघातून एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. यासह मतदारांना नोट चा पर्याय देखील उपलब्ध करून दिला गेला होता. मंगळवारी झालेल्या मतगणनेत नितीन गडकरी यांनी अपेक्षेप्रमाणे आघाडी घेतली. विकास ठाकरे यांनीही त्यांना जोरदार टक्कर देत एकतरफा लढत होऊ दिली नाही. मात्र नागपुरातील इतर उमेदवारांना एक हजार मते मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागला. याउलट नोटाने मतदारसंघातील इतर २३ उमेदवारांपेक्षा अधिक प्राप्त केली. याला अपवाद केवळ बहुजन समाज पक्षाचे उमेदवार ठरले.
मंगळवार दुपारपर्यंत बसपचे उमेदवार योगेश लांजेवार हे मतगणनेत तिसऱ्या स्थानावर असून त्यांना १३ हजार १५० मते प्राप्त झाली. यानंतर मतदारांनी सर्वाधिक पसंती नोटाला दिली. नोटाला दुपारपर्यंत ३ हजार ७१९ मते मिळाली आहेत. देश जनहित पक्षाचे उमेदवार किविंसुका सुर्यवंशी ( १ हजार ४४९ मते) आणि अपक्ष उमेदवार आदर्श ठाकूर ( १ हजार ९६ मते) वगळता इतर उमेदवार एक हजार मतांचा आकडा देखील गाठू शकले नाही. नागपूर लोकसभा मतदार संघात गडकरी आणि ठाकरे वगळता इतर सर्व उमेदवारांची सुरक्षा ठेव जप्त होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय आहे की लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला २५ हजार रुपये सुरक्षा ठेव जमा करावी लागते. मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी सहावा भाग उमेदवाराला प्राप्त न झाल्यास उमेदवारांची सुरक्षा ठेव जमा केली जाते.
यांना एक हजाराहून कमी मते
ॲड.उल्हास दुपारे (९१२ मते), फहीम खान (६०५ मते), सुरज मिश्रा ( ५६३ मते), टेकराज बेलखोडे (५१६ मते), गरुद्री आनंदकुमार (४७३ मते), धनू वलथरे (४२१ मते), विजय मानकर (४१९ मते),विशेष फुटाणे (४०४ मते), संतोष लांजेवार (३९३ मते),श्रीधर साळवे (३२३ मते), गुणवंत सोमकुंवर (३०५ मते), सुनील वानखेडे (२३० मते), दीपक मस्के (१७९ मते),सुशील पाटील (१७१ मते), संतोष चव्हाण (१६१ मते),नारायण चौधरी (१५८ मते), प्रफुल भांगे (१४८ मते),सचिन वाघाडे (१३९ मते),बबिता अवस्थी (१२६ मते),विनायक अवचट (१२६ मते),साहिल तुरकर (९५ मते)