नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धेतील महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील कुलगुरूंच्या नेमणुकी प्रकरणी विद्यापीठाच्या ‘व्हीजीटर’ (कुलाध्यक्ष) या ना्त्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एका प्रकरणात नोटीस बजावली आहे.विश्वविद्यालयाच्या नियमाप्रमाणे राष्ट्रपती या विद्यापीठाच्या‘व्हीजीटर (कुलाध्यक्ष) असतात. या नात्याने न्यायालयाने ही नोटीस बजावण्यात आली आहे.हिंदी विद्यापीठातील प्रा. डॉ. एल. करुण्यकरा यांनी त्यांचे वकील फिरदोस मिर्झा यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे आणि उर्मिला फाळके (जोशी) यांच्या खंडपीठाने मंगळवारी ही नोटीस बजावली.
विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांनी १४ ऑगस्ट २०२३ रोजी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला होता. दुसऱ्याच दिवशी विश्वविद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम होता. शिष्टाचारातील अडचणी लक्षात घेता विश्वविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक एल. कारुण्यकारा यांच्याकडे प्रभारी कुलगुरूचा कारभार देण्यात आला. १९ ऑक्टोबर रोजी कुलाध्यक्षाच्या रूपात राष्ट्रपतींनी प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांचा कुलगुरूपदाचा राजीनामा स्वीकारला आणि अतिरिक्त प्रभार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. भीमराय मेत्री यांना सोपवला . याच निर्णयावर प्रा. एल. कारुण्यकारा यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी ‘ व्कुहीजीटर’ म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विश्वविद्यालयाच्या कुलसचिव आणि डॉ. मैत्री यांना नोटीस बजावली. २९ नोव्हेंबरपर्यंत यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याचिकाकर्ता एल. कारुण्यकारा यांच्यातर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली तर केंद्र शासनातर्फे ॲड. नंदेश देशपांडे यांनी बाजू मांडली