यवतमाळ : बाभूळगाव येथील वाळू चोरटा देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. शेख राहील शेख युनूस (२२) रा. घोंगडेबाबा ले आऊट, बाभूळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी वाळू चोरी तसेच मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाभूळगावमधील बागीलाल पार्कजवळ शुक्रवारी एक तरुण देशी कट्टा घेऊन असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने घटनास्थळी पोहोचून शेख राहील शेख युनूस यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात ५० हजार रुपये किमतीची देशी पिस्तुल तसेच मॅगझीनमध्ये एक जीवंत काडतूस आढळून आले.

हेही वाचा – नक्षलवाद्यांकडून माजी सरपंचाची हत्या, पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून कृत्य

हेही वाचा – मेडीगड्डा धरणाला पुनर्बांधणीची गरज, केंद्रीय पथकाचे ताशेरे

राहील विरोधात बाभूळगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३२५ व कलम १३७ महाराष्ट्र कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, अमलदार विनीद राठोड आदींनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली केली.