शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा राज्य शासनाचा संकल्प आजतागायत पूर्ण झाला नाही. कदाचित त्यासाठी माझी ताकद कमी पडत आहे. मात्र, माझ्याकडे शब्दसंपत्ती भरपूर आहे आणि त्याच संपत्तीतून महाराजांचे ‘शब्दस्मारक’ उभारण्याचा संकल्प मी येत्या तीन-चार वर्षात नक्की पूर्ण करणार आहे, अशा शब्दात ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी राज्य शासनाला शाब्दिक चिमटे काढले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पानिपत, संभाजी यांच्यासह अनेक कादंबरीचे लेखक व साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारांचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ‘महासम्राट’ ही कादंबरीमाला लवकरच येत आहे. त्याचा पहिला खंड ‘झंझावात’ या नावाने प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने विश्वास पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाने अनेक वर्षापूर्वी व्यक्त केला. पण तो प्रत्यक्षात उतरताना दिसून येत नाही. शासनाचे होईल तेव्हा होईल, पण मी महाराजांचे शब्दस्मारक नक्की पूर्ण करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १९४०-५०च्या दशकात कादंबरीमाला हा प्रकार होता. चार-चार खंडांची कादंबरी त्यावेळी लिहिल्या जात होती. दरम्यानच्या काळात ही माला बंद झाली. छत्रपती शिवराय एका परिघात मावणारे नाहीत. अनेकांनी त्यांना छोटे करुन एका चित्रपटात, एका लिखाणात मांडण्याचा प्रयत्न केला. तो मला पटला नाही. त्यांचे विराट आणि खरे स्वरुप मला लोकांसमोर मांडायचे होते आणि म्हणूनच या कादंबरीमालेचा घाट ‘महासम्राट’ या नावाने घातला आहे, असे विश्वास पाटील म्हणाले.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

या ‘झंझावात’ मध्ये शिवाजी महाराजांचा जन्मापूर्वीचा काळ शब्दांकित केला आहे. तर दुसरा भाग ‘रणखैंदळ’ या नावाने येत आहे. यात शिवाजी महाराजांचा १६६१ ते १६६४ हा चार वर्षांचा काळ शब्दांकित करण्यात आला आहे. छत्रपती ही जन्माने एक व्यक्ती असली तरीही कर्माने ती अतिशय क्रियाशील. त्यामुळे त्यांना समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या मातोश्री जीजाबाई आणि त्यांचे वडील शहाजी राजे यांनाही तेवढेच समजून घ्यावे लागेल. त्याशिवाय शिवाजी महाराज समजणार नाहीत, असे विश्वास पाटील म्हणाले. महाराष्ट्राने माझ्या शब्दांवर खूप प्रेम केले. जाती, धर्मासाठी माझी लेखणी नाही. मला कोणता राजकीय फायदा करुन घ्यायचा नाही. तर माणूस म्हणून शिवाजी महाराज कसे उभे राहिले ते विराट रुप लोकांसमोर मांडायचे आहे, असेही पाटील म्हणाले. यावेळी केशव-कृष्णा फाउंडेशनचे राजा भोयर उपस्थित होते.