अमरावती : शहराचे झपाट्याने होणारे नागरीकीकरण, त्यात वाहनांची वाढती संख्या यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने देशातील अनेक शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला असून अमरावती शहरासाठी ५० बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – रेल्वेतून विनातिकीट प्रवास महागात! ५ कोटी ६४ लाखांचा दंड वसूल
हेही वाचा – बुलढाणा : ग्रामपंचायत निवडणूक; गुलाबी थंडीत मतदानही थंड! पहिल्या टप्पात ९ टक्केच मतदान
विदर्भात नागपूरनंतर आता अमरावती शहरातही इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यानंतर इंधनावरील खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे शहराचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. अमरावती महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा सध्या सुरू असली, तरी मर्यादित असल्याने नागरिकांना पर्यायी खासगी सेवेचा वापर करावा लागतो. आता केंद्र सरकारने ई-बसेस मंजूर केल्याने हा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, आता महापालिका प्रशासनाला प्राधान्याने ई-बसेससाठी चार्जिंगची व्यवस्था आणि देखभालीची व्यवस्था करावी लागणार आहे.