नागपूर : केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. विद्यार्थ्यांनी बारावी उत्तीर्ण होऊन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास त्यांना १० हजार ते २० हजार रुपये दरम्यानची शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाला ५० हजारापर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी एक अर्ज करावा लागणार आहे. अर्जदाराचे वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जातींना १५टक्के अनुसूचित जमातींना ७.५ टक्के, ओबीसींना २७टक्के आणि अपंगांना ५ टक्के शिष्यवृत्ती मिळेल.
अर्ज करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ हायर एजुकेशन वर क्लिक करा. त्यानंतर सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज एंड यूनिवर्सिटी स्टूडेंट्सवर क्लीक करा. याठिकाणी शिष्यवृत्ती बाबतची सर्व माहिती पाहता येईल. त्यानंतर होमपेजवरील न्यू रजिस्ट्रेशन वर क्लीक करा आणि जर अधीच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉगिन करून अर्ज भरू शकता. यापूर्वी शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थीही यासाठी अर्ज करू शकतात. त्यांनी मागील वर्षी या विषयात किमान ६० टक्के गुण मिळवले असावेत.