चंद्रपूर : जिल्ह्यात विविध सण, उत्सव, यात्रा दरम्यानचे बंदोबस्त तसेच व्हीआयपी, व्हीव्हीआयपी दौरा, सभा बंदोबस्त आणि अनेक प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच्या बंदोबस्तात महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात येते. नियुक्तीच्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिला पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान ही बाब लक्षात येताच पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी जुन्या चारचाकी वाहनाचे नुतनीकरण करून त्यात दोन टॉयलेट आणि एक वॉशरूमसह पाणी व फॅनची व्यवस्था असलेली एक ‘शी व्हॅन’ फिरते प्रसाधनगृहाचे निर्माण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील महिला पोलीस नागरिकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसभर कर्तव्यावर असतात. बंदोबस्तादरम्यान कर्तव्यावर तैनात असलेल्या महिला पोलिसांना वेळीच प्रसाधन उपलब्ध होत नाही. स्वच्छतागृहांचा त्रास बंदोबस्ताच्या वेळी महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी अधिकच उग्र होतो. पुरुष अंमलदार तरी कुठे आडोशाला जाऊन लघवी करून घेतो, मात्र, महिलांनी त्यातही गणवेशातील महिला पोलिसांनी कुठे जायचे असा प्रश्न पडतो आणि बंदोबस्तादरम्यान नैसर्गिक विधींना अवरोध केल्याने त्याचे दूरगामी परिणाम महिलांवर होऊन त्यांच्या युरिनरी ट्रॅक इन्फेकशनचे प्रमाण वाढीस लागतात. कारण अनेकदा कर्तव्यादरम्यान लघवी लागू नये म्हणून महिला पोलीस पाणी पिण्याचेदेखील टाळतात. त्यामुळे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी महिला पोलिसांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारच्या मोठ्या बंदोबस्ताच्या वेळी कर्तव्यावरील महिला पोलिसांना नैसर्गिक विधी पार पाडण्यासाठी एक अभिनव उपाय योजना म्हणून पोलीस मोटार परिवहन विभागातील एक जुन्या चारचाकी वाहनाचे नुतनीकरण करून त्यात दोन टॉयलेट आणि एक वॉशरूमसह पाणी व फॅनची व्यवस्था असलेली एक ‘शी व्हॅन’ फिरते प्रसाधनगृहाचे निर्माण केले आहे. महिला पोलिसांसाठी तयार केलेले ‘शी व्हॅन’ फिरते प्रसाधनगृह यापुढे जिल्ह्यातील विविध बंदोबस्ताच्या वेळी महिला पोलिसांच्या सुविधेसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे महिला पोलिसांसाठी स्वच्छतागृहाचा प्रश्न सुटून त्यांचे आरोग्य स्वस्थ राहील आणि स्त्रीचे आरोग्य स्वस्थ असेल तर ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या अधिक मजबूत होईल.

हेही वाचा – नागपूर : थुकण्यावरून महापालिकेने कमावले ७ लाख रुपये…

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी फिरते प्रसाधनगृहाचे निर्माण केले आहे. वाहनाचे उद्घाटनाच्या प्रसंगी चंद्रपूर पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परेदशी, प्रिती रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू पोलीस उपअधिक्षक मुख्यालय राधीका फडके तसेच मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश आस्कर आणि मॅकेनिक स्टॉफ आणि अनेक महिला पोलीस अंमलदार हजर होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now she van toilet for women police in chandrapur rsj 74 ssb
Show comments