वर्धा : शालेय शिक्षण विभागाने विशेष गरजा असणाऱ्या म्हणजेच दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलत दिली आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सवलत मिळणार आहे.
हेही वाचा – अमृत २.० अभियानाला राज्य शासनाची मंजुरी; चंद्रपूर महापालिकेला मिळणार २७० कोटी
हेही वाचा – उद्धव ठाकरेंकडे काही विषय नाही, नैराश्यातून ते…; उदय सामंत यांची टीका
टाईप एक मधुमेह असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी आणलेले खाद्यपदार्थ शाळेच्या वर्गखोलीत खाण्याची परवानगी मिळाली आहे. स्पर्धा परीक्षा तसेच शाळेच्या इतर परीक्षेवेळी मधुमेहाच्या गोळ्या सोबत नेण्याची मुभा मिळेल. सोबत आणलेले औषध, फळे, पिण्याचे पाणी, सुका मेवा आदी परीक्षेच्या हॉलमध्ये शिक्षकाकडे ठेवाव्या. गरज पडल्यास अशा विद्यार्थ्यांना द्याव्यात. टाईप एक मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांना ग्लुकोमीटर व ग्लुकोज चाचणी पट्ट्या सोबत ठेवण्याचीपण परवानगी आहे. इन्सुलीन पंपपण सोबत नेता येईल. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून या बाबत शिफारस करण्यात आली होती.