नागपूर : मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच आता एसटी कर्मचारीही महागाई भत्यासह विविध मागण्यांसाठी ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणावर बसणार आहेत. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठा आंदोलनावर अद्यापही शासनाला तोडगा काढता आला नाही. त्यातच आता एसटी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत. महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेकडून आंदोलनाची एसटी महामंडळाला नोटीसही बजावली आहे. शासनाला वारंवार मागणी केल्यावरही न्याय मिळत नसल्याने आंदोलन करावे लागत असल्याचे महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटचे म्हणणे आहे.

हेही वाचा – सात वर्षानंतर पुन्हा मराठा क्रांती मोर्चा, बुलढाण्यात १३ सप्टेंबरला आयोजन

हेही वाचा – चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी होणार पायलट, फ्लाईंग क्लबची लवकरच निर्मिती

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ४२ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह द्या, २०१८ पासूनची महागाई भत्याची थकबाकी द्या, एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ ची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्या, एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०२१ पर्यंतची घरभाडे भत्त्याची थकबाकी द्या, मूळ वेतनात जाहीर केलेल्या रकमेने सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेली तफावत दूर करा सातवा वेतन आयोग द्या आणि इतरही मागण्या शासनाकडे संघटनेकडून वारंवार करण्यात आल्या आहे. परंतु आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. शेवटी न्यायासाठी आता आंदोलन करावे लागत आहे.