चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखे लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत आगमन झाले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रपूर, वर्धा, नागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा परिसर फुलुन गेला होता.

विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पेशवेकालीन टोपी, शाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार पंकज भोयर, आश्विनी जिचकार, भाजप प्रदेश सचिव राजेश बकाने,वर्धा भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, बंटी (जीतेंद्र) कुकुडे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर, विष्णू चांदे महानगर संघटन मंत्री नागपूर, बादल राऊत भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर, चंद्रपूरच्या माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी भाजप महानगर अध्यक्ष चंद्रपूर डॉ.मंगेश गुलवाडे, नीलेश किटे, सुभाष कासनगोटूवार, ब्रीजभूषण पाझारे, जयंत कावळे, राजू मुक्कावार,सचिन बोगावार, स्वप्नील कलुरवार उपस्थित होते.

Mohan Bhagwat, Chandrapur, RSS,
सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याचा चंद्रपुरात जाहीर निषेध, आंदोलन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Rahul Gandhi criticizes Narendra Modi regarding Shivputla GST demonetisation
पंतप्रधानांनी देशवासीयांचीच माफी मागावी; शिवपुतळा, जीएसटी, नोटाबंदीचा उल्लेख करत राहुल गांधी यांचे टीकास्त्र
Movement of Mahavikas Aghadi in case of Chhatrapati Shivaji Maharaj statue accident
‘जोडे मारा’वरून जुंपली! पुतळा दुर्घटनाप्रकरणी मविआचे आंदोलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र
MVA Protest in Mumbai
MVA Jode Maro Andolan : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं जोडे मारो आंदोलन, ठाकरे-पवारांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर
Opposition leader Vijay Wadettiwar criticism of the Sanjay Rathod plot case Nagpur news
मतांसाठी लाडक्या बहिणीला १५०० रुपये आणि लाडक्या मंत्र्याला ५०० कोटींचा भूखंड; संजय राठोड भूखंड प्रकरण
case against sculptor and consultant marathi news
शिल्पकार, सल्लागारावर गुन्हे; मालवण पुतळा दुर्घटनाप्रकरणी सदोष मनुष्यवधाचाही ठपका
Bhagwan Rampure sculptor, Solapur,
सोलापूर : पुतळा उभारताना तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याचा संशय, ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांचे ताशेरे

हेही वाचा >>> नागपुरात महामेट्रो तयार करणार, ८७० मीटर लांब भुयारी मार्ग; शनिवारी भूमिपूजन

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, वाघनखांसह महाराजांची जगदंबा तलवार आणि लंडनच्या संग्रहालयातील महाराष्ट्राच्या वारसाची साक्ष देणाऱ्या इतर वस्तूही लवकरच भारतात आणण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू. लंडन आणि जपानचा दौरा आटोपल्यानंतर मी भारतात परतलो त्यावेळी आपले भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या या प्रेम आणि आपुलकीने मी भारावलोय. आम्ही पुणेकर या संस्थेने श्रीनगरातील कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन त्यांना यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सीमेवर हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहुनच धडकी भरेल, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.