पाच वर्षांपूर्वी अडकले होते विवाह बंधनात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : उपराजधानीत विवाहबद्ध झालेल्या, पण अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दाम्पत्याचा घटस्फोट कौटुंबिक न्यायालयाने ‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झाला. मुलगा हा नागपूरचा रहिवासी असून मुलगी मूळची हैदराबादची आहे. सध्या मुलगी अमेरिकेत असून ती भारतात परतण्यास तयार नसल्याने न्यायालयाने असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागला. यापूर्वी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कौटुंबिक न्यायालयाने कौटुंबिक खटले निकाली काढले आहेत.

३५ वर्षीय प्रशांत (नाव बदललेले) हा नागपुरातील त्रिमूर्तीनगरचा रहिवासी आहे, तर मुलगी हैदराबादची आहे. मुलगा सॉफ्टवेअर अभियंता असून अमेरिकेतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीला आहे. त्याचे वास्तव्य मिशिगन अमेरिका येथे आहे. २०१३ मध्ये त्याचा विवाह हैदराबाद येथील रुचा (बदललेले नाव) हिच्याशी झाला. तिनेही सॉफ्टवेअर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते, पण तिला अमेरिकेत नोकरी नव्हती. विवाहानंतर काही दिवस ते नागपुरात राहिले. त्यानंतर ते अमेरिकेला निघून गेले.

अमेरिकेत तिनेही नोकरी शोधली. विवाहाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्यात खटके उडायला लागले. वाद विकोपाला गेल्याने डिसेंबर २०१७ मध्ये ते विभक्त झाले. दोघेही अमेरिकेतच वेगळे राहू लागले. जानेवारी २०१८ मध्ये प्रशांत हा नागपुरात आला असता त्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला होता. पण, ती घटस्फोट प्रकरणाच्या सुनावणीसाठी देशात परतण्यास तयार नव्हती. प्रकरण प्रलंबित होते. शेवटी प्रकरण मध्यस्थाकडे पाठवण्यात आले. महिनाभरापूर्वी प्रशांत पुन्हा भारतात परतला. दरम्यान, रुचाने प्रकरणाच्या सुनावणीकरिता हजर राहण्यासाठी भावाच्या नावाने आममुखत्यार पत्र करून दिले. तसेच अमेरिकेतून प्रतिज्ञापत्र तयार करून पाठवले. दोघांमध्ये तडजोड होऊन सामंजस्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला.

दोघांमध्ये सामंजस्य करार तयार करण्यात आला व घटस्फोट मंजूर करण्यासाठी न्यायालयासमोर सादर करण्यात आले. त्यानंतरही न्यायालयासमोर उभे राहून दोघांनीही सांगणे आवश्यक असल्याने १४ जानेवारीला कौटुंबिक न्यायालयाने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुचाशी संवाद साधला व घटस्फोट मंजूर केला. प्रशांततर्फे अ‍ॅड. समीर सोनवणे आणि रुचाच्या वतीने अ‍ॅड. स्मिता सिंगलकर यांनी बाजू मांडली.

‘व्हीसा’ची अडचण!

प्रशांतला अमेरिकेचे नागरिकत्व आहे. पण, रुचाला अद्याप अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले नाही. शिवाय ती ज्या ठिकाणी काम करते, त्यांच्याकडूनही व्हीसाकरिता शिफारस होण्याची शक्यता कमीच आहे. ती एकदा देशात परतली, तर पुन्हा अमेरिकेत जाण्यासाठी व्हीसा मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तवून तिने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगचा मार्ग निवळला.