एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करत शुक्रवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. एनएसयुआय आणि स्टुडंट राइट असोसिएशनने आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार अभिजित वंजारी यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>खळबळजनक! पतीने मद्यधुंद अवस्थेत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून पेटत्या शेकोटीत फेकले

एमपीएससी मंडळाने नवीन वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू केला. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाईल. त्यांना पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

हेही वाचा >>>अकोला : पांढऱ्या सोन्याच्या भावात चढउतार, उत्पादकांची विक्रीसाठी अकोटकडे धाव

एमपीएससीच्या परीक्षांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून घोटाळे होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. यामुळे एमपीएससी विरोधात आंदोलन करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत. परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाही मुलांच्या भविष्याची काळजी वाटत आहे. अनेक विद्यार्थी शेती विकून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करताय. परंतु वारंवार बदलणाऱ्या शासनाच्या धोरणाचा फटका त्यांना बसतोय. याविरोधात आंदोलन करण्यात आले तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nsui agitation for new syllabus for mpsc dag 87 amy
Show comments