नागपूर : नागपूर- मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गावर डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. परंतु मृत्यू संख्या मात्र वेगळेच काही चित्र दर्शवत आहे. या माहितीच्या अधिकारातून पुढे आलेल्या समृद्धी महामार्गावरील तपशीलाबाबत आपण जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर डिसेंबर २०२२ मध्ये ६९ अपघातात चौघांचा मृत्यू झाला. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान १ हजार ५४० अपघातात १३९ मृत्यू नोंदवण्यात आले. तर १ जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यानच्या अकरा महिन्यांत या महामार्गावर १ हजार ६१४ अपघातात ८८ मृत्यू झाले. त्यातही वरील कालावधीत सर्वाधिक १९८ अपघात आणि २२ मृत्यू हे २०२४ च्या जून महिन्यात नोंदवण्यात आले. या महामार्गावर प्रत्येक वर्षी अपघातांची संख्या वाढत असली तरी मृत्यू संख्या मात्र कमी होत असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती.

समृद्धी महामार्गाचे नेमके नाव काय?

मुंबई- नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा, ६ पदरी, १२० मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग (रस्ता) आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडणार आहे टप्या- टप्याने या महामार्गाचे काम होत असून तो वाहतुकीसाठी सुरूही केला जात आहे. हा महामार्ग राज्यातील १० जिल्हे, २६ तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे.

अपघातांचा तपशील

महिना अपघात मृत्यू
डिसेंबर २२ ६९ ०४
जानेवारी २३ ८९ ०९
फेब्रुवारी २३ ९८००
मार्च २३ ११२ १७
एप्रिल २३१३६ १५
मे २३ १७३१३
जून २३ १८० १९
जुलै २३ १२७ ३२
ऑगस्ट २३ १३९ ०९
सप्टेंबर २३ १०७ ०३
ऑक्टोबर २३ १२४ १४
नोव्हेंबर २३ १३१ ०७
डिसेंबर २३ १२४ ०१
जानेवारी २४ ११६ ०८
फेब्रुवारी २४ ११२ १५
मार्च २४ १२१ ०८
एप्रिल २४ १५९ ०६
मे २४ १८२ १०
जून २४ १९८ २२
जुलै २४ १३२ ०३
ऑगस्ट २४ १३९ ०४
सप्टेंबर २४ १२७ ०२
ऑक्टोबर २४ १६१ ०५
नोव्हेंबर २४ १६७ ०५
एकूण ३२२३ २३१