लोकसत्ता टीम
नागपूर: नागपुरातील दंगल प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या आता १०५ वर पोहचली आहे. त्यात दहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंट्सच्या चौकशीदरम्यान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना अटक केली आहे. चौकशीत हिंसाचाराचे नियोजन सकाळीच झाल्याचे सोशल मीडिया अकाउंट्सच्या चौकशीदरम्यान पुढे आल्यावर ही कारवाई झाली.
शहर पोलिसांकडून दंगलीत सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यावर आता पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सुरवातीला आरोपीचा शोध घेण्यावर मर्यादा असल्या तरी आता पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याला गती दिली आहे. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात डॉ. सिंगल यांनी शहरातील शांतता पूनस्थापीत करण्यावर भर दिला. बैठकीत पोलीस संबंधित भागातील परीस्थितीवर लक्ष ठेऊन असून संचारबंदीबाबत शनिवारी पुन्हा विचार होण्याचे संकेतही बैठकीत दिले गेले.
महाल परिसरात ६१ वाहने उध्वस्त
महालमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक मुल्यांकणात दंगलीत ६१ वाहनांचे नुकसान झाल्याचे पुढे आले.
सोशल मीडिया अकाउंट्सच्या चौकशीदरम्यान…
महालच्या हंसापुरीमध्ये १७ मार्च रोजी हिंसाचाराची घटना घडली. हिंसाचार पसरवण्यात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही पोलिसांना आढळून आले. तेव्हापासून पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलिस सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करत आहेत. या दिशेने पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. या दिशेने हमीद आणि शहजाद यांना अटक करण्यात आली आहे.
१७ मार्च रोजी सकाळी हमीद इंजिनिअरने मुजाहिदीनसाठी देणग्या गोळा करण्याचे आवाहन केले होते. त्याला विचारले असता, त्याने गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचे सांगितले. हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान हा हमीदच्या पक्षाचा नेता आहे. यावरून असे दिसून येते की हमीदने हिंसाचारातही महत्त्वाची भूमिक बजावली होती. त्याचप्रमाणे, शहजाद खान हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याचे वक्व प्रसारित केले होते.