लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात खाटांची संख्या कमी व रुग्णसंख्या अधिक अशी स्थिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर दिसून आली. आरोग्य यंत्रणा सक्षम करून रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, तसेच रुग्णालयात असलेल्या दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. यावेळी त्यांनी रुग्णांसोबतही संवाद साधला.

जिल्हाधिकारी म्हणाले, रुग्णांना वेळेवर औषधोपचार व इतर आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी परिसरात शेड उभारावे. अतिदक्षता विभागात अत्याधुनिक सोयी उपलब्ध राहण्यासाठी दुरुस्तीची कामे तातडीने करा. तसेच नवजात शिशु कक्षात विद्युतीकरणाचे काम संबंधित यंत्रणेने पूर्ण करून अहवाल सादर करावा. रुग्णालयाची स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, याकडे दुर्लक्ष करू नका, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

आणखी वाचा-ना रुग्णालय प्रशासक, ना अतिदक्षता तज्ज्ञ! शासकीय रुग्णालयांमधील मृत्यू कमी कसे होणार?

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम, अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, विभागप्रमुख डॉ. राजेंद्र सुरपम, डॉ. अशोक गजभिये, डॉ. प्रशांत गजभिये आदी उपस्थित होते. तीन महिन्यांचे वेतन प्रलंबित असल्यामुळे संपावर असलेल्या आंतरवासिता डॉक्टरांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.

‘नांदेड सारखी स्थिती होऊ देऊ नका’

वैधक महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुरपाम, बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशू कक्षाचे डॉ. मिलिंद कांबळे यांना काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, युवक काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, प्रवीण पडवेकर, सकीना अन्सारी, वीणा खनके, शालिनी भगत यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन नांदेड सारखी स्थिती होऊ नये याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.