चंद्रपूर : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळ्या बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच ताडोबात आता काळ्या बिबट्याचे पर्यटकांना हमखास दर्शन होत आहे.
नुकताच मोहर्ली परिसरात पर्यटकांना काळा बिबट्या दिसला. त्याची व्हिडीओ चित्रफित समाजमाध्यमात फिरत आहे. ताडोबा प्रकल्प पट्टेदार वाघाच्या मनसोक्त दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. बिबट्यादेखील येथे हमखास दर्शन देतो. मात्र मागील काही दिवसांपासून आता येथे सातत्याने काळा बिबट्या पर्यटकांना आकर्षित करत आहे. काही दिवसांपूर्वी मादी बिबट्या दोन काळ्या बिबट्याच्या पिल्लांसह जंगलात भ्रमंती करताना दिसली होती. त्याचीदेखिल चित्रफित सार्वत्रिक झाली होती. त्यापूर्वी एक काळा बिबट्या सातत्याने पर्यटकांना दिसत होता.
हेही वाचा – रस्त्यावर चिखल, उडणारे पाणी अन् बेजार नागपूरकर, काय आहे स्थिती?
आता पुन्हा एकदा काळा बिबट्या दर्शन देत आहे. वाघासाठी प्रसिद्ध ताडोबात सातत्याने काळा बिबट पर्यटकाना दिसत आहे. या काळ्या बिबट्याची चर्चा माध्यमात सुरू असल्याने पर्यटकात काळ्या बिबट्याचे आकर्षण वाढले आहे. असे असले तरी फार क्वचित प्रसंगी हा बिबट दिसतो. गुरुवारला ताडोबाच्या मोहर्ली येथे काही पर्यटकांना काळा बिबट दिसला. काळ्या बिबट्याचा हा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.