अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. मात्र अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशात अनुसूचित जाती आणि भटक्या जाती, जमाती प्रवर्गात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रथमच झालेल्या ‘जेंडर ऑडिट’मधून ही माहिती समोर आली आहे.
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारे ‘जेंडर ऑडिट’ अहवाल तयार करण्यात आला आहे. विद्यापीठातील विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवर्गनिहाय प्रवेश, विद्यार्थ्यांचा खेळांमधील आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतील सहभाग तसेच ‘कमवा आणि शिका’ या योजनेतील विद्यार्थ्यांचा सहभाग या संदर्भातील माहिती संकलित करण्यात आली. सोबतच विद्यापीठातील एकूण शिक्षक, शिक्षकेत्तर, अंशदायी शिक्षक यांच्या प्रमाणाची माहिती गोळा करण्यात आली. या सर्व माहितीच्या आधारे लिंगभाव दृष्टिकोनातून माहितीचे विश्लेषण करण्यात आले.
हेही वाचा – तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षाच्या प्रवेशात अनुसूचित जाती आणि विशेष मागास प्रवर्गात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. खेळांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण जास्त आहे. ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक आहे. विद्यापीठातील शिक्षकांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. अंशदायी शिक्षकांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे, तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अत्याधिक असून स्त्रियांचे प्रमाण अतिशय अत्यल्प आढळून आले आहे.
या अभ्यासामध्ये आवश्यक भाग वाढविण्यात येणार असून त्याच्या आधारे विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयांमधील ‘जेंडर ऑडिट’च्या दृष्टीने आवश्यक माहितीचे संकलन पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘काँग्रेसवालो, लाडली बहनासे डरो’, कुणी दिला हा इशारा
सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढला आहे. अशावेळी कामाच्या ठिकाणी लिंगभाव संवेदनशीलतेचा विकास होण्याच्या दृष्टीने आणि धोरणात्मक निर्णयात सकारात्मक बदल होण्याच्या दृष्टीने ‘जेंडर ऑडिट’ महत्त्वाचे ठरते, असे मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांनी सांगितले.
विद्यापीठ पातळीवर लैंगिक समानतेच्या दृष्टीने धोरणात्मक कार्य करण्यासाठी ‘जेंडर ऑडिट’ हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारे ते तयार करण्यात आले असून सद्य:स्थितीत ते विद्यापीठ परिसरापुरतेच मर्यादित आहे. लवकरच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची माहिती मागविण्यात येणार असून त्यांचेही ‘जेंडर ऑडिट’ करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी सांगितले.