नागपूर : लहान बहीण खडू किंवा लेखणी खात असल्यामुळे ती नेहमी आजारी पडत होती. त्यामुळे मोठ्या बहिणीने तोडगा म्हणून एक प्रयोग केला. खायला गोड आणि कॅल्शियम, प्रोटिनयुक्त पौष्टिक खडूची निर्मिती केली. त्या खडूने फळा-पाटीवर लिहिता येते आणि तो खडू खाताही येतो. या खडूची मागणी वाढली असून बी. हरिप्रिया (तेलंगणा) असे खडू तयार करणाऱ्या बालसंशोधकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांचा खडू किंवा लेखणी खाण्याचा प्रकार नवीन नाही. चुन्याने बनलेला खडू हा आरोग्यास अपायकारक असतो. परंतु, खडू खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. त्यामुळे जर खाण्यास योग्य आणि शरीरास अपायकारक नसलेला खडू तयार करण्याची १५ वर्षीय बी. हरिप्रिया या विद्यार्थिनीला कल्पना सुचली. तिला लहान बहीण असून खडू खाण्याची सवय होती. त्यामुळे ती नेहमी आजारी पडत होती. शेतमजुरीचे काम करणारे वडील नरसिंगम आणि गंगाभवानी यांना मजुरी पाडून रुग्णालयात जावे लागत होते.

हेही वाचा >>> नीता अंबानी यांनीही महिला विज्ञान काँग्रेसला येण्याचे टाळले

बहिणीची खडू खाण्याची वाढती सवय बघता हरिप्रियाला गुळापासून खडू बनवण्याची कल्पना सुचली. मात्र, खाकी रंगामुळे तो खडू न खाता बहीण पुन्हा चुन्याचा खडू खात होती. शेवटी जिल्हा परिषद शाळा गोदावरीखानी येथील शिक्षिका यांना तिने समस्या सांगितली. शिक्षिकेने तिला पौष्टिक खडू तयार करण्यासाठी मदत केली. चुन्याऐवजी पिठीसाखर, तांदळाचे पीठ, तीळ आणि शेंगदाण्याचे पीठ यापासून पांढऱ्या रंगाचे खडू तयार केले. त्या खडूंना डॉक्टरांकडून तपासून घेतले. ते खाण्यासाठी पौष्टिक असल्याचे समजताच मोठ्या प्रमाणात खडू तयार करण्यात आले. प्राथमिक शाळेतील मुले-मुली त्या खडूने पाटी-फळ्यावर लिहित होती तसेच खात होती. त्यातून हरिप्रियाने मोठ्या प्रमाणात खडू तयार केले. आजूबाजूच्या गावातील शाळांमध्ये ते खडू पोहचवले. यासोबतच गर्भवती महिलांसुद्धा हे पौष्टिक खडू खायला लागल्या. त्यामुळे खडूची आता मागणी वाढली असून ते खडू प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutritional chalk created by a tiny researcher nagpur news adk 83 ysh
Show comments