पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व चायनीज मांजामुळे यापूर्वी अनेकांना प्राण गमवावे लागले. शेकडो पक्षी मृत्युमुखी पडले. याला आळा घालण्यासाठी नायलॉनच्या मांजावर बंदीचा प्रस्ताव महापालिका सभेत आणला जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याबाबत संक्रांत तोंडावर आली असताना अजूनही निर्णय घेण्यात आला नाही. दरवर्षी पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जात असली तरी विक्री थांबली नाही हे येथे उल्लेखनीय.
नायलॉन मांजामुळे मानव आणि पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. गतवेळी तीन व्यक्तींना मांजामुळे प्राण गमवावे लागले होते. जखमी होणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. मांजामध्ये अडकून दरवर्षी मोठय़ा प्रमाणात पक्षी जखमी होतात.
त्यामुळे मागील दोन वर्षांपासून नायलॉन आणि चायनीज मांजावर बंदी आणावी, अशी मागणी केली जात आहे. गेल्यावर्षी महापालिका सभागृहात हा प्रस्ताव आणला जाणार होता. मात्र, तो आणला गेला नाही. त्यामुळे यावेळी तरी तो सभागृहात येऊन त्यावर निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, अद्याप त्या दिशेने कोणतीही हालचाल नाही. संक्रांतीला मोठय़ा प्रमाणात पतंग उडवल्या जातात. त्यासाठी नायलॉन व चायनीज मांजा वापरला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याची विक्री सुरू झाली आहे.
पक्षांच्या जीवाला धोका
पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजासारख्या धोकादायक पदार्थाची विक्री आणि साठवणूक करण्याची परवानगी देऊ नये, खरेदी-विक्री करणाऱ्यांवर भादंविच्या कलम ४४ नुसार कारवाई करावी, असे पर्यावरण विभागाच्या अधिसूचनेत नमूद आहे. तरीही शहरात सर्रासपणे विक्री होत आहे. इतवारी आणि गांधीबाग येथून मोठय़ा प्रमाणावर पतंग आणि मांजाची विक्री केली जाते. स्वयंसेवी आणि महापालिकेच्या सूचनेनंतर गेल्यावर्षी पोलिसांनी विक्रेत्यांवर कारवाई केली होती. यावर्षी स्वयंसेवींकडून ओरड होत असली तरीही अद्याप कारवाई करण्यात आली नाही. यावर्षी नायलॉन मांजाचे दोन बळी गेले, तर चार पक्र्षी जखमी झाले. नायलॉन मांजाची अवैध विक्री आणि वापरासंदर्भात काही पशूप्रेमींनी पोलीस ठाणे तसेच संबंधित विभागांकडे तक्रारीसुद्धा केल्या आहेत. त्यामुळे मकरसंक्रांतीपर्यंत या विक्रेत्या आणि वापरकर्त्यांवर कारवाईचा फास आवळला जातो का, याची प्रतीक्षा पशूप्रेमी करत आहेत.
‘‘नायलॉन मांजावर बंदी आणण्यासाठी महापालिकेत गेल्यावर्षी प्रस्ताव दिला होता तसा यावेळी दिला, परंतु तो सभागृहापुढे का आला नाही, याबाबत माहिती घ्यावी लागेल. काही सामाजिक संघटनांनी बंदी संदर्भात सूचना केल्या आहेत आणि त्यांची बैठक घेतली जाणार आहे. यावेळी शहरातील विविध भागातील पुलावर तार लावण्यात येणार आहे. नागरिकांनी पतंग उडवताना नायलॉन, चायनीज किंवा काचेच्या मांजाचा उपयोग टाळून पक्षी व मानवाची जीवितहानी टाळावी. सोबतच संक्रांतीच्या काळात नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी.’’ – डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी, महापालिका