नागपूर : ओबान या नामिबियन चित्त्याने पुन्हा एकदा कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर धूम ठोकली आहे. अलीकडेच जिथे दोन वाघ सोडण्यात आले होते, त्या माधव राष्ट्रीय उद्यानात तो दाखल झाला आहे. त्यामुळे वाघ आणि चित्ता समोरासमोर येणार का, आले तर काय, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मध्य प्रदेशातील श्योपूरमधील कुनो राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडून नर चित्ता ओबान शेजारच्या शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानात दाखल झाला आहे. या उद्यानात अलीकडेच दोन वाघ सोडण्यात आले होते. ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांपैकी ओबान हा चित्ता पाच वर्षांचा आहे. तो रविवारीच कुनो राष्ट्रीय उद्यानातून बाहरे पडला. यापूर्वी तो दोन एप्रिलला कुनोतून बाहेर पडला होता आणि चार दिवसांनी शिवपूरी जिल्ह्यातील बैरांड येथून त्याला परत कुनोत आणण्यात अले होते. शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी ओबानच्या हालचालींची नोंद झाली. यावर्षी मार्चमध्ये वाघांची संख्या पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नात माधव राष्ट्रीय उद्यानात वाघ आणि वाघिणीला सोडण्यात आले. चित्ता त्या ठिकाणी गेला असला तरी कोणताही संघर्ष होणार नाही, असा विश्वास कुनोच्या अधिकाऱ्यांना आहे.
हेही वाचा – नागपूर : उपराजधानीत चक्क १ किलोचा एक आंबा..
नामिबियातील आठ चित्ते १७ सप्टेंबरला कुनो राष्ट्रीय उद्यानात आणले होते, तर यावर्षी १८ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणण्यात आले. त्यापैकी एकाचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला.