गोंदिया : देशात व राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना यावर विरोधी पक्षांकडून भाजप वर सातत्याने होत असलेला टिकेचा भडिमार हे पाहून राज्यातील भाजपतर्फे ओबीसी जागर यात्रेचा आयोजन करण्यात आलेला आहे. पण केंद्रातील गेल्या ९ वर्षात ओबीसींचा मुद्दा निकाली काढू न शकलेल्या भाजप वर आता ओबीसी बांधवांचा विश्वास राहिला नाही की काय याची प्रचिती ६ ऑक्टोबरला गोंदिया जिल्हयात आलेल्या भाजपच्या ओबीसी जागर यात्रेतून दिसून आली.

या यात्रेचा भाजपकडून प्रचार प्रसार करूनही ओबीसी बांधवांनी या यात्रेकडून आपली पाठ फिरविल्याचेच दिसून आले. गोंदियातील जयस्तंभ चौकातून काढलेल्या रैलीत सामसूम दिसून आला. त्यानंतर गोंदियातील एका सभागृहात भरविलेल्या सभेत ही, ही भाजपची ओबीसी जागर यात्रेची सभा की भाजपचा पदाधिकारी मेळावा अशीच चिन्हे दिसून आली. या ओबीसी जागर यात्रेत सहभागी झालेले भाजप चे महाराष्ट्र ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, माजी आ. आशिष देशमुख व गोंदिया-भंडारा चे खासदार सुनिल मेंढे तिरोड्याचे आ. विजय रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांना पण सभागृहातील उपस्थिती पाहून भविष्यातील चित्र समजू शकेल अशीच परिस्थिती येथील जलाराम सभागृहात निर्माण झाली होती.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा >>> वैमानिक प्रशिक्षणासंदर्भात चंद्रपुरात प्राथमिक चाचणी; नागपूर फ्लाईंग क्लबचे विमान मोरवा विमानतळावर दाखल

सभा सुरू झाल्यानंतर वक्त्यांनी भाजपनी ओबीसी करिता काय काय केले याचा पाढा वाचण्यापेक्षा मोदी पुराण कडे अधिक भर दिल्यामुळे उपस्थितांनी कटांळवाना होवून सभागृहातून बाहेर राहणेच अधिक पसंत केले असल्याचे सभागृहातील रिकाम्या खुर्च्या पाहून दिसून आले. खासदार सुनिल मेंढे यांनी ही आपण मागील ५ वर्षात काय केले हे सांगणे सोडून ९ वर्षात मोदींनी काय केले हेच सांगणे महत्वाचे समजले. लोक सभागृह रिकामे करित आहेत हे पाहून आपल्या अध्यक्षीय भाषणाकरिता आलेल्या माजी आमदार आशिष देशमुख यांनी पण आपल्या भाषणातून या जिल्हयातील काँग्रेस नेते नाना पटोले हे कसे ओबीसी विरोधी भूमिका निभावतात. बाकडे आपल्या भाषणाचा ओघ राखला आणि सभागृह रिकामे होतानी बघताचा त्यांनी आपले भाषण संपुष्टात आणले.

हेही वाचा >>> चंद्रपूर: १३ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत

नुकतेच राज्यातील. ठिकठिकाणी ओबीसींचे मोर्च आंदोलने झाली त्यात नेतृत्व करणा-यांकडून निघालेला एक सूर असा होता की विद्यमान राज्य वा केंद्र सरकार’ ओबीसी बांधवांचा उद्धार करू शकत नाही हे गोंदिया जिल्हयात पण झालेल्या ओबीसी जनआक्रोश आंदोलनातील वक्त्यांचा सूर होता. त्यामुळे आता ओबीसींना हे कळून चुकले आहे की भाजप आपल्याला कधी ही तारू शकत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांनी राज्यातील नेतेमंडळी या ओबीसी जागर कार्यक्रमात आली असून सुद्धा याकडे पाठ दाखविली असल्याचे असू शकते.