चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भ विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा तसेच ओबीसी समाजाप्रती उदासीन भूमिका असल्याचा आरोप करीत ओबीसी व विदर्भवादी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत रविवार, २५ जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देत हा निर्णय घेतल्याचे जीवतोडे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत २५ जून रोजी जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी ३.३० वाजता भाजप प्रवेश सोहळा आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री शोभा फडणवीस, आ. बंटी भांगडिया, आ. परिणय फुके, आ. संदीव बोदकुलवार, आ. संदीप धुर्वे, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित राहणार आहेत.