महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण केंद्र म्हणजेच ‘महाज्योती’च्या विविध योजना सुरू असल्या तरी व्यवस्थापकीय संचालकांच्या दुर्लक्षामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा, आरोप करीत विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयासमोर आंदोलन केले. बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी नागपूर येथील महाज्योती कार्यालयाला भेट दिली असता विद्यार्थ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले व मागण्या मान्य न झाल्यास सावे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर : ब्रम्हपुरीतील मुलीवर बलात्कार प्रकरणात आणखी ५ आरोपी , राजकीय नेत्यांचाही समावेश

पीएच.डी. शिष्यवृतीच्या विद्यार्थी संख्येत वाढ करणे, एम.फील. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना संलग्नित अधिछात्रवृत्ती द्यावी, बार्टी संस्थेप्रमाणे विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून एम.फील. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना पाच वर्षे अधिछात्रवृत्ती द्यावी अशा विविध मागण्यांसाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले व अतुल सावे यांना निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास सावे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.