भंडारा :  जिल्ह्यात आढावा बैठकीला येणाऱ्या उद्योग मंत्री उदय सामंत यांना भंडारा ओबीसी क्रांती मोर्च्याचा रोषाला सामोर जावे लागणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करत कुणबी समाजाचे दाखले देण्याची भूमिका घेतल्यास भंडाऱ्यात येणारे शिंदे सरकारचे मंत्री उदय सामंत यांना ओबीसी क्रांती मोर्च्याच्या वतीने काळे झेंडे दाखवत निषेध करणाचा निर्धार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> रस्ते की गटारगंगा? हलक्या पावसातच रस्त्यावर खड्डेच खड्डे!

ओबीसी क्रांति मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. विशेष म्हणजे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास वैनगंगा नदीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाकडून याआधीच देण्यात आला आहे. या संघटनेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या विरोधात एल्गार पुकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा पेटलेला वाद सध्या तरी मिटेल, असे दिसत नाही. या इशाऱ्याने भंडारा पोलीस विभागासह जिल्हा प्रशासनाचे पुन्हा टेंशन वाढले आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण त्यात यश येताना दिसत नाही. दरम्यान मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्यानंतर ओबीसी पेटून उठला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी या निर्णयाला आधीच विरोध केला आहे. आता यामध्ये भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाने उडी घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc kranti morcha will show black flag to industry minister uday samant in bhandara ksn
Show comments