लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: कुठल्याही प्रकारे आम्ही ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केला.

विमानतळावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला सरकार आरक्षण देणार आहे, तसा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. हे करताना कोणावरही अन्याय होणार नाही. ओबीसी समाजाला मी याबाबत आश्वस्थ करतो. महाराष्ट्रात दोन समाज एकमेकापुढे उभे आहे, असे चित्र निर्माण होणे योग्य नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी.

आणखी वाचा-संतापलेल्या शेतकऱ्याकडून वीज अभियंत्यास बेदम मारहाण, कारण…

छत्रपती संभाजी राजे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमातून लोकांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहचणार असून ही योजना नागपूरमध्ये राबवली जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.