गडचिरोली : शहरातील एका सहायक अभियंत्याला ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघांची ५ फेब्रुवारीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली. तर पत्रकार रविकांत कांबळे यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह चित्रफिती आढळल्याने चौकशीसाठी त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हनीट्रॅप करणाऱ्या चार जणांच्या टोळीला २९ जानेवारी रोजी गडचिरोली गुन्हे शाखेने नागपूर येथे पकडले होते. त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. कोठडीची मुदत संपल्याने ५ रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पोलीस शिपाई सुशील गवई, रोहित अहिर व इशानी या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्हा कारागृहात पाठवले. तर पत्रकार
रविकांत कांबळे यास दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली. या प्रकरणात एक महिला आरोपी अद्यापही फरार आहे. तिचा शोध सुरू असल्याचे पो.नि. अरुण फेगडे यांनी सांगितले.

हेही वाचा – उपराजधानीत गन कल्चर फोफावतंय… बंदुकबाजांची दहशत वाढली; चार वर्षांत ९४ गुन्ह्यात १०६ पिस्तूल जप्त

हेही वाचा – वर्धा : ताटवाट्या वाटप, झुंबड उडाल्याने अपघाताची शक्यता

चौकशीदरम्यान याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या रविकांत कांबळेच्या मोाईलमध्ये काही आक्षेपार्ह चित्रफिती आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावर न्यायालयाने रविकांतच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान आणखी काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Objectionable tapes in possession of police in honeytrap case ssp 89 ssb